विद्रोही साहित्य संमेलनात मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना रोखले जातं...
97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. रवींद्र शोभणे हे विद्रोही साहित्य संमेलनाला भेट देण्यास गेले असता, त्यांना रोखण्यात आलं. हा प्रकार दोघा साहित्य संमेलनाच्या शेवटच्या दिवशी विद्रोही साहित्य संमेलनाच्या मंडपात घडला.
पूज्य साने गुरुजींच्या अमळनेरात एकाचवेळी मराठी साहित्य संमेलन आणि विद्रोही साहित्य संमेलन सुरु होती प्रा.रवींद्र शोभणे हे विद्रोही साहित्य संमेलनाला भेट द्यायला गेले होते. त्यांनी विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष वासुदेव मुलाटे यांची मंडपात गळाभेट ही घेतली. त्याचवेळी विद्रोही साहित्य चळवळीचे राज्य संघटक किशोर ढमाले यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मंडपात गोंधळ उडाला. काही काळ तणावाच वातावरणही झालं. मात्र नंतर विद्रोही संमेलनाचे निमंत्रक रणजीत शिंदे यांनी रवींद्र शोभणे यांना पेढा भरवला. आणि हा वाद शांत झाला....