संजय राऊत यांची पत्रकार परिषद संपतच होती तितक्यात अचानक या पत्रकार परिषदेमध्ये सापाने एन्ट्री केली सुरक्षा रक्षकांना ही बाब कळताच त्यांनी तातडीने संजय राऊत यांच्या दिशेने येत असलेल्या या सापाला उसकावून लावण्याचा प्रयत्न केला परंतु हा साप काही या परिसरातून जाण्यास तयार नव्हता अखेर प्राणी मित्रांना पाचारण करण्यात आलं आणि या प्राणी मित्रांनी पत्रकार परिषदेच्या ठिकाणी लपलेल्या या सापाला सुरक्षित रित्या रेस्क्यू केलं आणि नैसर्गिक अधिवासात त्याची मुक्तता केली पाणदिवड जातीचा हा बिनविषारी साप होता या सापाला पकडल्यावर सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला परंतु अचानक आलेल्या या सापामुळे पत्रकार परिषदेत एकच गोंधळ उडाला.