Vedanta- Foxconn चा नवा निर्णय, उद्योग मंत्र्यांनी मानले आभार

वेदांता फॉक्सकॉन कंपनीचा प्रकल्प महाराष्ट्राऐवजी गुजरातमध्ये गेल्याने राज्याचे राजकारण चांगल तापले आहे. या पार्श्वभूमीवर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी एक महत्त्वाची माहिती दिली आहे. वेदांत फॉक्स कॉन कंपनीने आपला आणखी एक प्रकल्प महाराष्ट्रात सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचं उदय सामंत यांनी जाहीर केले आहे.;

Update: 2022-09-15 03:32 GMT


वेदांता फॉक्सकॉन कंपनीचा प्रकल्प महाराष्ट्राऐवजी गुजरातमध्ये गेल्याने राज्याचे राजकारण चांगल तापले आहे. या पार्श्वभूमीवर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी एक महत्त्वाची माहिती दिली आहे. वेदांत फॉक्स कॉन कंपनीने आपला आणखी एक प्रकल्प महाराष्ट्रात सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचं उदय सामंत यांनी जाहीर केले आहे.

हा प्रकल्प गुजरातमध्ये जाण्यास शिंदे फडणवीस सरकार जबाबदार आहे असा आरोप विरोधकांनी सातत्याने सुरू ठेवला आहे, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला आणखी मोठा प्रकल्प देऊ असं आश्वासन दिल्याचं उद्योग मंत्री उदय सामंत यांनी बुधवारी स्पष्ट केले होते.

दरम्यान वेदांत फॉक्स कॉन कंपनीने आपला प्रकल्प गुजरातमध्ये नेला असला तरी दुसरा एक संलग्न प्रकल्प महाराष्ट्रात उभारणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली आहे.

"वेदांता-फॉक्सकॉनच्या संलग्न प्रकल्पासाठी महाराष्ट्राची निवड करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल वेदातांचे अध्यक्ष अनिल अगरवाल यांचे आभार. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक यावी आणि राज्यातील बेरोजगारी दूर व्हावी यास्तव युती सरकार कटिबद्ध आहे.

: उदय सामंत,

उद्योगमंत्री, महाराष्ट्र राज्य."

असे ट्विट सामंत यांनी गुरुवारी सकाळी केले.

त्याआधी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन उदय सामंत यांनी महाविकास आघाडी सरकारने कंपनीला योग्य तो प्रतिसाद न दिल्यामुळे कंपनीने आधीच गुजरातमध्ये प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला होता, असे स्पष्टीकरण दिले होते.

तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून संवाद साधत महाराष्ट्राचा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याबाबतचा मुद्दा त्यांच्या कानावर घातला होता. त्यानंतर पंतप्रधानांनी महाराष्ट्रासाठी वेदांतापेक्षाही मोठा प्रकल्प देण्याचे आश्वासन दिले, अशी माहितीही उदय सामंत यांनी दिली होती.

Tags:    

Similar News