अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत राष्ट्रपती पदावरील वादविवाद राजकीय वातावरणाचा एक महत्त्वपूर्ण भाग असतो. या वादविवादांमुळे मतदारांना उमेदवारांची विचारसरणी, धोरणे, आणि भविष्याच्या दृष्टीने त्यांची भूमिका स्पष्ट होते. राष्ट्राध्यक्ष निवडणूक ही अमेरिकन लोकशाही प्रक्रियेतील सर्वात जास्त लक्ष वेधणारी आणि व्यापक स्तरावर परिणाम करणारी घटना आहे. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष पदावरचे वादविवाद राष्ट्राच्या राजकीय अजेंडाचा केंद्रबिंदू ठरतात.
वादविवादांमधील प्रभावीता ही उमेदवाराच्या वक्तृत्वकलेवर आणि त्याच्या मांडणीच्या पद्धतीवर अवलंबून असते. कोणत्या मुद्द्यावर किती स्पष्टपणे, आत्मविश्वासाने आणि तथ्यांवर आधारित चर्चा होते, हे बरेच महत्त्वाचे ठरते. मतदार हे पाहतात की, उमेदवाराच्या धोरणांमध्ये आणि वचनांमध्ये कितपत प्रामाणिकपणा आहे, आणि त्याचा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर काय परिणाम होऊ शकतो.
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदासाठी होणारे वादविवाद हे निवडणूक प्रक्रियेतील एक महत्त्वाचा भाग आहेत. हे वादविवाद उमेदवारांच्या व्यक्तिमत्त्वाचे आणि राजकीय धोरणांचे परीक्षण करतात आणि त्यांचे मतदारांवर होणारे परिणाम स्पष्ट करतात. यामुळेच हे वादविवाद राष्ट्राच्या राजकीय अजेंडाचा केंद्रबिंदू ठरतात, कारण यावरच देशाच्या भविष्यातील दिशा ठरते.अमेरिकेत 47 व्या राष्ट्राध्यक्षांसाठीची निवडणूक लढत हळूहळू अंतिम फेरीकडे सरकत आहे. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रिपब्लिकन पक्षाकडून तर कमला हॅरिस डेमोक्रॅटिक पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत. कमला हॅरिस या भारतीय वंशाच्या नेत्या असून सध्याचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्या सरकारमध्ये त्या उपराष्ट्रपती म्हणून कार्यरत आहेत. निवडणुकीबाबत दोन्ही उमेदवारांमधील तणाव इतका वाढला आहे की, गेल्या आठवड्यात झालेल्या दुसऱ्या अध्यक्षीय चर्चेत दोन्ही उमेदवारांनी एकमेकांवर जोरदार निशाणा साधला. फिलाडेल्फिया येथील एका प्रसिद्ध विद्यापीठात झालेल्या चर्चेत दोन्ही उमेदवारांनी अमेरिकन जनतेला गर्भपात, बंदूक नियंत्रण, राष्ट्रीय कर्ज, आरोग्य आणि सामाजिक लाभ, इमिग्रेशन, अर्थव्यवस्था आणि परराष्ट्र धोरणाशी संबंधित त्यांच्या संबंधित दृष्टिकोनाची ओळख करून दिली. चर्चेनंतर केलेल्या सर्वेक्षणात 63 टक्के लोकांनी कमला यांनी ट्रम्प यांच्यापेक्षा चांगली कामगिरी केल्याचे सांगितले, तर केवळ 37 टक्के लोक ट्रम्प यांच्या कामगिरीवर खूश आहेत. निवडणुकीचा निर्णय घेणाऱ्या सात राज्यांमध्ये म्हणजे स्विंग स्टेटसमध्येही कमला ट्रम्प यांच्या बरोबरीच्या स्थितीत किंवा त्यांच्यापेक्षा किंचित पुढे असल्याचे दाखवण्यात आले आहे. अमेरिकेच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष होण्याचा दावा करणाऱ्या कमलामध्ये एका सुसंस्कृत आणि सभ्य देशाच्या राष्ट्राध्यक्षाची प्रतिमा लोकांना दिसत आहे. ५ नोव्हेंबरला निवडणुका होणार आहेत.अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत अध्यक्षीय वादविवाद खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. निवडणुकीदरम्यान होणाऱ्या अशा वाद-विवादांमध्ये उमेदवार आपला चार वर्षांचा अजेंडा आणि अमेरिकेबद्दलची त्यांची दृष्टी मतदारांसमोर मांडतात. ही निवडणूक केवळ अमेरिकन मतदारच नाही तर जगातील इतर देशही या प्रकारच्या चर्चेवर लक्ष ठेवून असतात, जे जाहीरनाम्याप्रमाणे काम करतात का याची दिशा या चर्चेतून होत असते व ही दुसरी अध्यक्षीय चर्चा होती. यापूर्वी 27 जून रोजी विद्यमान अध्यक्ष जो बिडेन आणि ट्रम्प यांच्यात प्रथम वादविवाद चर्चा वाद झाली होती. या चर्चेत जो बिडेन कमकुवत ठरले होते ते पण कमला हॅरिस पुर्ण आत्मविश्वासाने वादविवाद चर्चेत ट्रम्प च्या एक पाऊल पुढे दिसतं आहे त्या पुढे सांगतात की त्या बिडेन किंवा ट्रम्प नाही. मी म्हणजे कमला हॅरिस, जिच्याकडे नवीन अमेरिकेचा मार्ग मोकळा करणारी योजना आहे. हॅरिसचा आत्मविश्वास आणि स्पष्टवक्तेपणा मतदारांना खूप आवडला. कमलाने संपूर्ण वादावर नियंत्रण राखले. दोन्ही नेत्यांमधील हा वाद विवाद चर्चा 6.75 कोटी लोकांनी पाहिला. बिडेन विरुद्धच्या चर्चेत ट्रम्प वरचढ दिसत असले तरी, मात्र दुसऱ्या चर्चेत कमला यांनी ट्रम्प यांच्यावर आघाडी घेतली. चर्चेदरम्यान अमेरिकन लोकांना कमला यांचे शब्द अधिक आवडले. मात्र, मंगळवारी हॅरिससोबत झालेल्या वादात आपण विजयी झाल्याचा दावा ट्रम्प यांनी केला. त्याने टूथ सोशलवर लिहिले की, जेव्हा एखादा प्रोफेशनल रेसलर लढत हरतो तेव्हा त्याच्या तोंडून पहिले शब्द बाहेर पडतात की मला रिमॅच हवी आहे. ट्रम्प यांनी चर्चेदरम्यान दावा केला कि रशिया-युक्रेन युद्ध ते एका दिवसात संपवू शकतात, असे त्यांनी म्हटले आहे. पण युद्ध थांबवण्यासाठी कोणती जादूची कांडी आहे हे त्याने सांगितले नाही. पश्चिम आशियाही हिंसाचाराच्या विळख्यात आहे. तैवानवर चीनचा हल्ला झाल्यास ट्रम्प यांची काय योजना आहे? परराष्ट्र धोरणाबाबत ट्रम्प यांच्या दृष्टिकोनाशी अमेरिकन सहमत असले तरी त्यांचा महिला, स्थलांतरित आणि विस्थापित लोकांबाबतचा दृष्टिकोन अत्यंत प्रतिगामी आहे, जो अमेरिकेसारख्या मजबूत लोकशाहीमध्ये अस्वीकार्य आहे.राष्ट्राध्यक्ष प्रमुख पदाशी सुसंगत असे म्हणता येणार नाही.
कमला यांनी अनेकदा सांगितले की ट्रम्प यांच्याकडे कोणतीही योजना नाही. तो फक्त स्वतःबद्दल आणि त्याच्या संपत्तीबद्दल बोलतो. चर्चेच्या शेवटी ट्रम्प यांनी बिडेन यांना इतिहासातील सर्वात वाईट राष्ट्राध्यक्ष आणि कमला यांना सर्वात वाईट उपाध्यक्ष म्हटले. माजी राष्ट्रपतींनी बिडेन-हॅरिस प्रशासनावर जोरदार हल्ला चढवला आणि म्हटले की त्यांनी देशाचा नाश केला आहे. कोट्यवधी गुन्हेगार आणि मानसिक त्रासलेले लोक पूर्णपणे अनियंत्रित अमेरिकेत ओतत आहेत आणि महागाईने आपल्या मध्यमवर्गाचे दिवाळे काढले आहे.
वादविवादानंतर निर्माण झालेल्या वातावरणाचा फायदा कमला यांनाही झाला. चर्चेच्या 24 तासांच्या आत, त्यांना अमेरिकन डॉलर US$47 दशलक्ष किमतीच्या देणग्या मिळाल्या. उमेदवारी जाहीर केल्यापासून ही त्यांची सर्वात मजबूत निधी उभारणीची कामगिरी आहे. कमला हॅरिस यांच्या प्रबळ उमेदवारीनंतर त्यांच्या विजयाचे अंतर कमी होताना दिसत आहे. मात्र, निवडणूक सर्वेक्षणात ट्रम्प अजूनही पुढे आहेत. मात्र दोन्ही उमेदवारांची स्थिती अशी नाही की, मोठ्या फरकाने विजयाचा अंदाज बांधता येईल. निवडणुकीचा निकाल काहीही लागला तरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि लष्करी ताकद असलेल्या देशातील राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा निकाल जगासाठी निर्णायक असेल व 2024 च्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील वादविवाद हा एक महत्त्वाचा मुद्दा असेल. या वादविवादामुळे मतदारांना दोन्ही नेत्यांच्या धोरणांचा आणि विचारसरणीचा थेट सामना होईल. प्रत्येक मुद्द्यावर या दोन नेत्यांची भूमिका आणि दृष्टिकोन विविध असतील, ज्यामुळे निवडणूक अधिक रोचक होईल.
विकास परसराम मेश्राम
मु+पो, झरपडा,ता, अर्जूनी/मोर, जिल्हा गोंदिया
मोबाईल नंबर -7875592800
vikasmeshram04@gmail.com