भारताच्या विनंतीला अमेरिकेकडून केराची टोपली

अवघा देश कोरोना हामारी च्या सुनामी लाटेवर असताना जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेत कडून भारताच्या कोरोना लसीसाठी आवश्यक कच्चा मालाच्या विनंतीला केराची टोपली दाखवण्यात आली आहे, तुम्ही तुमचं पाहून घ्या अशा शब्दात अमेरिकेने भारताला फटकारले आहे.

Update: 2021-04-24 09:56 GMT

शभरामध्ये साडेतीन लाखापेक्षा जास्त लोक एकाच दिवसात कोरोना बाधित झाले असताना

आतापर्यंत 1 लाख 90 हजार लोकांना मृत्यूला सामोरे जावे लागले आहे.

भारतामध्ये सिरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक कडून कोरोना लसीचे उत्पादन केले जात आहे. सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांच्याकडून काही दिवसांपूर्वी कोरोना लसीच्या कच्चा माला संदर्भात थेट अमेरिकेचे अध्यक्ष जो बाईडन यांना विनंती करण्यात आली होती.

त्यानंतर भारत सरकारच्या वतीनेही कोरोना लसीसाठी आवश्यक कच्चा माल देण्याची विनंती भारतानं अमेरिकेकडे केली होती.

अमेरिकेतील मोठा कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असताना लसीकरणाचा कार्यक्रम युद्धपातळीवर सुरू आहे. कोरोना लसीसाठी लागणारा कच्चा माल देशाबाहेर न पाठवण्याचा निर्णय अमेरिकेनं घेतला आहे. ही निर्यातबंदी मागे घेण्याची विनंती भारताकडून करण्यात आली होती. मात्र अमेरिकेनं निर्यातबंदीचा निर्णय रद्द करण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला. आमचं प्राधान्य अमेरिकन नागरिकांना आहे. आमचे नागरिक ही आमची जबाबदारी आहे, असं उत्तर अमेरिकेकडून भारताला देण्यात आल्या ने भारताच्या परदेशी मुत्सद्देगिरी वर आता प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहे.

गेल्या वर्षी अमेरिकेत कोरोनाची भीषण लाट आली होती. त्यावेळी कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेलं हायड्रॉस्किक्लोरिक्वीन भारतातून अमेरिकेला निर्यात करण्यात आलं होतं.

अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आवाहनाला केंद्र सरकारनं अनुकूल प्रतिसाद दिला होता. भारतातून हायड्रॉस्किक्लोरिक्वीनच्या कोट्यवधी गोळ्या निर्यात केल्या गेल्या. अमेरिका संकटात असताना भारतानं मासकीच्या भावनेतून मदत केली. मात्र आता भारत अडचणीत असताना अमेरिकेनं मात्र हात वर केले.

कोरोनाच्या नव्या विषाणूचा स्ट्रेन जगासाठी डोकेदुखी बनली असून अनेक देशांनी भारतामध्ये प्रवास करण्यासाठी त्यांच्या नागरिकांना बंदी घातली आहे.

भारतामधील कोरोना परिस्थिती इतकी गंभीर आहे की अनेक ठिकाणी आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. ऑक्सिजन बेड्स, औषधे आणि रुग्णवाहिकांची कमतरता जाणवत आहे. असं असतानाच भारतातील गंभीर परिस्थिती पाहून पाकिस्तानने भारतासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. पाकिस्तानमधील सेवाभावी संस्था असणाऱ्या एधी फाउंडेशनने भारताला ५० रुग्णवाहिका देण्याची इच्छा व्यक्त केलीय. यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्रही लिहिलं आहे. पाकिस्तानमध्ये सध्या एधीने घेतलेल्या या पुढाकारासाठी संस्थेचं कौतुक केलं जात आहे.पाकिस्तान मधील नागरिकांनीही भारताला मदत करावी यासाठी ट्विटर ट्रेंड सुरु केलाय. #PakistanstandswithIndia हा ट्विटर ट्रेंड सध्या टॉपवर आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी देशवासीयांना आवाहन करताना सर्वांनी खबरदारी घेण्याचे सांगितले आहे अन्यथा आपली अवस्था देखील भारतासारखे होईल असा इशारा दिला आहे.



 


Tags:    

Similar News