Up Election: 5 व्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात, काय घडणार अयोद्धेत? केशव प्रसाद मौर्य आपला गड राखणार का?

उत्तरप्रदेशात पाचव्या टप्प्यातील 61 जागांसाठी मतदान पार पडणार आहे.;

Update: 2022-02-27 03:47 GMT

उत्तर प्रदेश विधानसभेसाठी 403 जागांसाठी 7टप्प्यात मतदान पार पडत आहे. आत्ता पर्यंत 4 टप्प्यात मतदार पडले असून उत्तर प्रदेश विधानसभेच्या पाचव्या टप्प्यासाठी आज म्हणजे २७ फेब्रुवारीला मतदान पार पडत आहे. आज राज्याच्या पूर्व भागातील 12 जिल्ह्यात 61 जागांसाठी मतदान होत असून 692 उमेदवार मैदानात आहेत. तर 2.24 कोटी लोक मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

या जिल्ह्यात पार पडणार मतदान…

सुल्तानपूर, चित्रकुट, प्रतापगड, कौशांबी, प्रयागराज, बाराबंकी,बहराइच,श्रावस्ती, रायबरेली, प्रतापगढ आणि गोंडा…

काय असणार राजकीय गणित-

2012 च्या विधानसभा निवडणूकीत आज पार पडत असलेल्या 61 जागेवर भाजप ला 13.1 टक्के मत मिळाली होती. भाजपला 2012 ला 5 जागांवर विजय मिळाला होता. तर समाजवादी पक्षाला सर्वांधिक 41 जागांवर विजय मिळाला होता. यावेळी सपाला 31 टक्के मत मिळाली होती. मात्र, 2017 मध्ये भाजपला 40.3 मत मिळाली होती. भाजप आणि मित्र पक्ष अपना दल (सोनेलाल) यांना 50 जागांवर विजय मिळाला होता. अपना दल (सोनेलाल) तीन जागा तर भाजपला 47 जागांवर विजय मिळाला होता. तर दुसरीकडे 2017 ला सपाचा विचार केला तर 28.1 टक्के मत मिळाली होती. याक्षेत्रात सपाला अवध्या 5 जागांवर विजय मिळाला होता.

याबरोबरच काँग्रेसचा विचार केला तर 2012 ला 13.1 टक्के मत मिळाली होती. तर 6 जागांवर विजय मिळाला होता. मात्र 2017 ला काँग्रेस ला या भागात फक्त एका जागेवर विजय मिळाला होता. सपा आणि काँग्रेस ने 2017 ला एकत्रित निवडणूक लढवली होती.

मायावती यांच्या पक्षाला 2012 साली 25 टक्के मत मिळाली होती. 2012 ला बसपाला 7 जागांवर विजय मिळाला होता. तर 2017 ला बसपाच्या मतांच्या टक्केवारीत घट झाली. 2017 ला बसपाला अवघ्या 3 जागांवर विजय मिळाला होता. मतांच्या टक्केवारीत घट होऊन 21.7 टक्के मतं बसपाला मिळाले होते.

महत्वाचे मतदार संघ…

काँग्रेस चा गड असलेल्या अमेठी आणि रायबरेली भागात मतदान होत आहे.

अयोद्धाः

भारताचे राजकारण ज्या अयोद्धेमुळे बदललं त्या अयोद्धेत राम मंदिराच्या निकालानंतर पहिल्यांदाच मतदान होत आहे. अयोद्धेतून स्वतः योगी आदित्यनाथ निवडणूक लढणार होते. मात्र, त्यांनी स्वतः अयोद्धेतून माघार घेत पुन्हा आपला गड असलेल्या गोरखपूर मधून मैदानात उतरले आहेत. अयोद्धेतून पक्षाने पुन्हा वेदप्रकाश गुप्ता यांना संधी दिली आहे. तर समाजवादी पक्षाकडून तेज नारायण पांडे मैदानात उतरले आहेत.

सिराथू

या विधानसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य उभा आहेत. त्यांच्या प्रचारासाठी स्वतः अमित शहा आले होते. समाजवादी पक्षाने या मतदार संघात पल्लवी पटेल यांना उमेदवारी दिली आहे. पल्लवी पटेल या अपना दल या पक्षाचे संस्थापक डाॅ. सोनलाल पटेल यांच्या कन्या आहेत. पटेल हे कुर्मी समाजाचे मोठे नेते होते. दुसरीकडे पल्लवी पटेल यांची आई कृष्णा पटेल देखील सपाच्या तिकिटावर निवडणूक लढत आहेत.

विशेष म्हणजे अपना दलाच्या नेत्या, पल्लवी पटेल यांची बहिण अनुप्रिया पटेल या केंद्रात मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत. बसपा ने या मतदार संघात मुस्लीम मतदारांची संख्या लक्षात घेऊन मंसह अली यांना तिकिट दिलं आहे.

या शिवाय योगी सरकार चे मंत्री सिद्धार्थ नाथ सिंह अलाहाबाद पश्चिम हून, राजेंद्र सिंह उर्फ मोती सिंह पट्टी मतदारसंघातून, नंद गोपाल गुप्ता नंदी इलाहाबाद दक्षिण मतदारसंघातून, रमापति शास्त्री मनकापुर मतदारसंघातून, रघुराज प्रताप सिंह उर्फ राजा भैया कुंडा मतदारसंघातून, कांग्रेसचे विधानसभेतील नेत्या आराधना मिश्रा मोना रामपुर खास मतदारसंघातून आणि अपना दलाचे नेते (कमेरावादी) कृष्णा पटेल प्रतापगढ़ मतदारसंघातून मैदानात आहे.

काय आहे जातीचं गणित

 पाचव्या टप्प्यात दलित मतांबरोबरच मुस्लीम मतांची संख्या अधिक आहे. मुस्लिम मतदारांची संख्या 18 टक्के आहे तर दलित मतदातारांची संख्या 22.5 टक्के आहे. त्यामुळे आज होणाऱ्या मतदारसंघात सवर्ण जाती आणि कुर्मी, यादव, मौर्य, शाक्य, राजभर, निषाद, बघेल, पाल, प्रजापति, कुम्हार या जातीची मतांची संख्या अधिक आहे. उत्तर प्रदेश मध्ये जातीच्या आधारावरच मतदान पार पडते. त्यामुळे 10 मार्चच्या निकालात उत्तरप्रदेशात भाजप सत्ता राखणार की सपा बाजी मारणार हे निश्चित होणार आहे.

Tags:    

Similar News