अवकाळी प्रश्न विधिमंडळ दणाणले: पंचनामे करणार फडणवीसांची ग्वाही
अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानी विधिमंडळाच्या ( legislature)पायऱ्यांवर आणि विधिमंडळात आज जोरदार रणकंदन झाले.. पंचनामेच्या आदेश दिले असून सर्वेक्षण करून योग्य मदत दिली जाईल अशी ग्वाई दिल्यानंतरच विरोधक विधानसभेत शांत झाले.;
अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विरोधी पक्षनेते अजितदादा पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायर्यांवर येत सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली. शेतकऱ्यांच्या पीकांचे पंचनामे झालेच पाहिजेत...अवकाळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळालीच पाहिजे... जाहीर करा, जाहीर करा शेतकऱ्यांना भरपाई जाहीर करा... मंत्री तुपाशी शेतकरी उपाशी... नुकसान भरपाई जाहीर करा, नाहीतर खुर्च्या खाली करा... अशा घोषणांनी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला.
विधानसभेचे कामकाज सुरू होताच अजित पवार यांनी स्थगन प्रस्तावद्वारे हा मुद्दा उपस्थित केला. राज्यात विविध भागात अवकाळी पाऊस, गारपिटीने उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला कांदा, गहू, हरभरा, सोयाबीन, मका, तूर, केळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे, तरी नुकसानीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी विधान सभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात केली.
विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, गेल्या दोन दिवसात नाशिक, धुळे, बुलडाणा, पालघर, बीड, जालना, पुणे, अहमदनगर, वाशिम, सोलापूर व राज्यातील इतर भागात मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला कांदा, गहू, हरभरा, सोयाबीन, मका, तूर, केळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच कापणीला आलेला गहू जमिनदोस्त झाला आहे, आंबा, काजू, द्राक्षे, केळी, संत्रा, लिंबू, पपई, कलिंगड यासारख्या अनेक फळपीकांबरोबरच हरभरा, तूर, मका, वाल, चवळी, पावटा व इतर रब्बी पालेभाज्या यांचेही नुकसान झालेले आहे. वीज अंगावर पडून जनावरे दगावली आहेत, मेंढ्यासुद्धा मृत झाल्या आहेत. शेतकरी दुहेरी आर्थिक संकटात सापडला आहे आंबा, काजू सारख्या पिकांचा मोहोर, व संत्रा लिंबू यांची फळे गळल्याने उत्पादनावर विपरीत परीणाम होणार आहे.
शेतकरी दुहेरी अडचणीत सापडल्याने सरकारने या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. या मागणीवर राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांनीही कांदा दरापाठोपाठ अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे पुरतं कंबरड मोडल्याचे निदर्शनास आणून दिलं. काँग्रेसचे आमदार नाना पटेल यांनीही या मागणी रेठत धरत तातडीने यासंदर्भात सरकारतर्फे घोषणा करण्याची मागणी केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभरात झालेल्या अवकाळी पावसाची माहिती यावेळी विधानसभेत दिली. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात पंचनामाच्या आदेश दिले असून पंचनामे झाल्या नंतर शासकीय निकषाप्रमाणे शेतकऱ्यांना मदत दिली जाईल अशी माहिती फडणवीस यांनी सभागृहात दिली.