मिशन वात्सल्य अंतर्गत लाभार्थ्यांना कायदे विषयी व इतर योजनांचे मार्गदर्शन...

Update: 2023-02-24 15:49 GMT

कोरोना काळात ज्यांच्या घरातील कर्ता पुरुष मृत्यूमुखी पडला. त्यांच्या कुटुंबियांना शासनाच्या वतीन एर्थिक मदत तसेच विविध योजना सुरु करण्यात आल्या आहेत. या योजनेची माहित देण्यासाठी मिशन वात्सल्य समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून विविध योजना तळागाळापर्यत पोहचवण्याचे काम सुरु आहे. आणि त्याचा पुरेपुर लाभ या कुटुंबियांना व्हावा या उद्देशाने ही समिती गावेगावी काम करत आहे. 

कोरोना काळामध्ये मयत झालेले पती व मयत झालेले पालक असे बालक व महिला यांच्यासाठी शासनाने मिशन वात्सल्य योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत पालक गमावलेले बालक व पती मयत झालेल्या महिला यांना शासनाच्या विविध योजनांच्या लाभ दिला जातो. त्यासाठी राज्यभरात तालुकास्तरावर मिशन वात्सल्य समितीचे गठीत करण्यात आलेले आहे.

मिशन वात्सल्य समितीत तहसीलदार अध्यक्ष तर तालुक्यातील इतर अधिकारी सहभागी आहेत. या योजनेअंतर्गत पालक गमावलेल्या बालक व पती मयत झालेल्या महिला यांना कृषी विभागाचे योजना महसूल खात्याचे संजय गांधी विभागाचे योजना तसेच न्यायालयीन अडचणी यासंदर्भात येणाऱ्या अडचणी कशा सोडवाव्यात आणि त्यासाठी कोणाचे मार्गदर्शन घ्यावे याबद्दल पंचायत समितीच्या मीटिंग हॉलमध्ये आज मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. या शिबिरात जिल्हा बाल प्रकल्प अधिकारी श्री परदेशी ऍड कोळी, ऍड पाटील, ऍड नेवे, बाल विकास प्रकल्प अधिकारी श्री धनगर कृषी अधिकारी यांच्यासह लाभार्थी उपस्थित होते. 

Tags:    

Similar News