Ukraine war : रशियाची भारतीय मीडियाला चपराक

भारतीय माध्यमात होत असलेल्या बेजबाबदार वार्तांकनावरून रशियाने भारतीय मीडियाचे कान टोचले आहेत.

Update: 2022-03-01 02:29 GMT

रशिया युक्रेन संघर्षाचे रुपांतर युध्दात झाले आहे. तर युध्दाला पाच दिवस झाले आहेत. मात्र अजूनही युध्द थांबले नाही. मात्र भारतीय माध्यमांमध्ये सुरस कथेसह बातम्या सादर केल्या जात आहेत. त्यावरून रशियाने भारतीय मीडियाचे कान टोचले आहेत.

रशिया युक्रेन युध्द पेटले आहे. तर या युध्दामुळे जग दोन गटात विभागले गेले आहे. तर अमेरीकेसह महत्वाच्या देशांनी रशियावर कठोर निर्बंध लादले आहेत. तर दुसरीकडे युक्रेन आणि रशियाने युध्द थांबवण्याबाबत चर्चा सुरू केली आहे. मात्र भारतीय माध्यमांमध्ये सुरस कथांसह बातम्या सादर केल्या जात आहेत. त्यापार्श्वभुमीवर रशियाने भारतीय मीडियासाठी अॅडव्हायजरी जारी केली आहे. तर त्यांच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून भारतीय मीडियाला चपराक लगावली आहे.

रशियाने भारतीय मीडियासाठी जारी केलेल्या अॅडव्हायजरीमध्ये म्हटले आहे की, युक्रेनमध्ये निर्माण झालेल्या परिस्थिती संदर्भात भारतीय माध्यमांनी जबाबदारीने आणि अचूक माहिती द्यावी. ज्यामुळे भारतीय लोकांना युक्रेन आणि रशियामधील सत्य परिस्थिती समजू शकेल, अशा शब्दात भारतीय माध्यमांचा उल्लेख करून रशियाने भारतीय माध्यमांना सल्ला देत कान टोचले आहेत.

रशिया युक्रेन युध्दामुळे जगात तिसरे महायुध्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र युक्रेनने दिलेला चर्चेचा प्रस्ताव स्वीकारून रशियाने बेलारुसमध्ये युक्रेनशी चर्चा सुरू केली आहे. त्यामुळे युध्द न होता युक्रेन आणि रशियामधील युध्दाला पुर्णविराम मिळावा, अशी प्रार्थना करत आहेत. मात्र माध्यमांनी तिसऱ्या महायुध्दासह अनेक खळबळजनक आणि तथ्यहीन वार्तांकन केल्यामुळे अखेर रशियाच्या भारतातील दूतावासाने भारतीय माध्यमांसाठी अॅडव्हायजरी सादर केली.


Tags:    

Similar News