मुंबईत वरळी डोममध्ये उद्या उद्धव ठाकरेंची महापत्रकार परिषद

मुंबईत वरळी डोममध्ये उद्या उद्धव ठाकरेंची महापत्रकार परिषद पार पडणार असून कायदेतज्ञही या पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार आहेत.;

Update: 2024-01-15 07:24 GMT

मुंबईत वरळी डोममध्ये उद्या उद्धव ठाकरेंची महापत्रकार परिषद पार पडणार असून कायदेतज्ञही या पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्रात डाऊटफुल्ल सरकार आहे

महाराष्ट्रातील सरकार सूडानं पेटलेलं सरकार. ज्या पद्धतीनं ठाकरे कुटुंबाचं संरक्षण, शिवसेना नेत्यांचं संरक्षण काढून घेतलं आहे. त्यामुळे भविष्यात काही घडलं, तर याची संपूर्ण जबाबदारी केंद्र सरकार आणि महाराष्ट्राच्या गृहखात्याची आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांनी दिली. " मातोश्रीबाहेर मोठी घटना घडण्याची शक्यता आहे, असा फोन महाराष्ट्र पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आला, याबाबतही संजय राऊतांनी भाष्य केलं आहे. संजय राऊत म्हणाले की, "फोन करणारे कोणते तरुण होते, हे मला माहिती आहे. राम मंदिर उडवून देण्याची धमकी देणारे विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते होते. त्यांनी मुस्लिम नावं घेतली होती आणि राम मंदिर उडवून देण्याची धमकी दिली होती. या देशात लोकसभा निवडणुकीपूर्वी अशाप्रकारे धार्मिक तेढ निर्माण करुन निवडणुका जिंकायच्या किंवा निवडणुकांना सामोरं जायचं. हे भाजपचं षडयंत्र आहे." पुढे बोलताना ते म्हणाले की, "ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी ही केंद्र सरकारची. महाराष्ट्रात डाऊटफुल्ल सरकार आहे, त्यांची नाही.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निकालावर खुली चर्चा.

मुंबईत वरळी डोममध्ये उद्या उद्धव ठाकरेंची महापत्रकार परिषद आयोजित करण्यात आली असून या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंसोबत कायदेतज्ज्ञही असतील. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी अपात्रता प्रकरणी दिलेल्या निकालावर उद्याच्या पत्रकार परिषदेत खुली चर्चा होईल, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. तसेच, ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी ही केंद्र सरकारची असून महाराष्ट्रात डाऊटफुल्ल सरकार आहे, त्यांची नाही, असं स्पष्ट वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. अयोध्येतील भव्य प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी ज्यांना ज्यांना बोलावलं आहे, त्यांनी सर्वांनी गेलं पाहिजे, असंही संजय राऊतांनी स्पष्ट केलं आहे. "उद्या दुपारी चार वाजता, वरळी डोम येथे उद्धव ठाकरे आणि काही कायदेपंडित यांची महापत्रकार परिषद आहे. या पत्रकार परिषदेत तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील. देशभरातील पत्रकारांना आम्ही आमंत्रित केलं आहे. त्यांच्यासमोर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी अपात्रता प्रकरणी निकाल दिला आहे. यावर खुली चर्चा होईल.", अशी माहिती संजय राऊतांनी दिली.

Tags:    

Similar News