धारदार शस्त्र बाळगलेल्या दोन संशयीतांना अटक, घातपाताचा कट होता का?

धारदार शस्त्र बाळगलेल्या दोन संशयीतांना अटक, घातपाताचा कट होता का?;

Update: 2021-11-13 16:01 GMT

जालना: सध्या राज्यात सामाजिकदृष्ट्या वातावरण दुषित झालं आहे. अमरावती, नांदेड, मालेगाव या ठिकाणी दंगल झाल्यामुळे पोलिसांनी रात्रीच खबरदारी म्हणून राज्यात बंदोबस्त वाढवला आहे. या बंदोबस्ता दरम्यान 12 नोव्हेंबरला पोलिसांनी जालना जिल्हाधिकाऱ्यांच्या ऑफिससमोरील सामान्य रुग्णालय रिक्षामध्ये दोन संशयित व्यक्तींना संशयितरित्या हालचाल करताना पाहिले. पोलिसांनी खबरदारी म्हणून तात्काळ त्यांना ताब्यात घेऊन त्यांची विचारपूस करुन झडती घेतली असता, स्वप्निल राजू घुमरे यांच्याकडे एक पांढऱ्या धातूचे धारदार दातेरी खंजर मोबाईल व रोख रक्कम आढळली.




तर दुसरा व्यक्ती संतोष कौतिकराव पारवे हा औरंगाबादचा राहणारा असल्याने तो इकडे कशासाठी आला? याचे योग्य उत्तर न दिल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.




महाराष्ट्रात दंगल सदृश्य परिस्थीती असताना अशा पद्धतीने दोन व्यक्ती शस्त्रासह सापडल्याने ते काही घातपात करणारे होते का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. पोलिस संदर्भात पुढील तपास करत आहे.

Tags:    

Similar News