भाजपाचा सोशल मिडीया प्रमुखाला ट्विटरकडून दणका

अमेरीकी अध्यक्षीय निवडणुकीत खोटे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्याचं ट्विटरनं वाभा़डं काढल्याच सर्वांनी पाहीलं असेल, आता भारतातही ट्विटरनं कारवाई करत थेट भाजपाच्या आयटीसेलच्या प्रमुखला खोटं ठरवलं आहे. मालवीय याने शेतकरी आंदोलनावरुन केलेल्या दाव्याला टि्वटरनं खोटं ठरवलं आहे.;

Update: 2020-12-02 11:27 GMT

काही महीन्यापूर्वी भाजपचे माजी अध्यक्ष अमित शहा यांनी आणि सोशल मिडीयातून खऱ्याचं खोटं करु शकतो असा दावा केला होता. भाजपा मिडीया सेल याच पध्दतीनं काम करत असल्याचं त्यानंतर सिध्द झालं होते. अमित मालवीय याने यापूर्वी अनेक फेकन्यूज पसरवल्या आहेत..

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उद्देशाने भाजपच्या आयटी सेलच्या प्रमुखांनी ट्विटरवरुन ट्विट केली होती.गांधी यांनी पीटीआयचे एक छायाचित्र ट्वीट केले होते ज्यात एका पोलिस कर्मचाऱ्याने दिल्लीत आंदोलन करणार्‍या वयोवृध्द

शेतकऱ्याला लाठीचार्ज केल्यांचा फोटा लावला होता. त्यांनी हिंदीमध्येही ट्विट के करुन "हा एक अतिशय दु: खी फोटो आहे. आमचा नारा होता 'जय जवान जय किसान' पण आज पंतप्रधान मोदींच्या अहंकाराने जवान शेतकऱ्याविरोधात उभे राहिले. हे खूप धोकादायक आहे. "


याला उत्तर देताना अमित मालवीय यांनी हा फोटो फेक असल्याचे सांगत एक दुसरा व्हिडीओ जोडत मारहाण झाली नाही असा दावा केला होता. विशेष म्हणजे अनेक फेक्टचेक संकेतस्थळांनी अमित मालवीय यांना खोटे ठरवले होते.

पीटीआय फोटोग्राफर रवी चौधरी यांनी आपल्या इंस्टाग्राम पेजवर अधिक फोटो पोस्ट करुन शेतकऱ्यांना पोलिसांनी

मारहाण केल्याचे सिध्द करुन दिले होते.

गांधी यांच्या ट्विटला उत्तर म्हणून मालवीय यांनी एक व्हिडिओ क्लिप शेअर केली ज्याला "वास्तविकता" असे म्हटले गेले होते, ज्यात पोलिस कर्मचार्‍यांचा शेतकर्‍याला स्पर्श होत नाही असा दावा केला होता.

- अमित मालवीय (@amitmalviya) 28 नोव्हेंबर 2020



- राहुल गांधी (@RahulGandhi) 28 नोव्हेंबर 2020

ट्विटरने श्री मालवीय ट्विटस "हेराफेरी" म्हणून टॅग केले.

Twitter tags Amit Malviya's tweet as 'manipulated media'

Twitter labels or removes content from its platform if they are found deceptive, altered or fabricated.

Tags:    

Similar News