TRP SCAM : अर्णबचा पाय खोलात, पार्थो दासगुप्ताची लेखी कबुली

TRP घोटाळ्यामध्ये नाव आलेल्या अर्णब गोस्वामीच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.

Update: 2021-01-25 06:52 GMT

TRP घोटाळ्यामध्ये आता अर्णब गोस्वामीच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी Broadcast Audience Research Council (BARC) चा माजी सीईओ पार्थो दासगुप्ताने मुंबई पोलिसांना दिलेल्या लेखी जबाबामध्ये अर्णबने टीआरपीमध्ये फेरफार करण्यासाठी आपल्याला ३ वर्षात ४० लाख रुपये दिले. तसेच दोनवेळा फिरण्यासाठीचा खर्चही केला.

टीआरपी घोटाळ्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या पुरवणी आऱोपपत्रात मुंबई पोलिसांनी ही माहिती दिली आहे. मुंबई पोलिसांनी ११ जानेवारी रोजी दाखल केलेल्या तीन हजार ६०० पानांच्या आरोपपत्रात BARCचा फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्ट, अर्णब आणि दासगुप्तामधील कथित वॉट्सअप संभाषण, कौन्सिलचे माजी कर्मचारी आणि काही केबल ऑपरेटर्ससह ५९ जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहे.

या आरोपपत्रात रिपब्लिक टीव्हीसह Times Now, आज तक या वाहिन्यांचीही नावे घेण्यात आली आहेत. या वाहिन्यांसाठी बार्कच्या काही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी टीआरपी फिक्सिंग केल्याचा आरोप ठेवण्यात आल्याचेही इंडिया एक्सप्रेसच्या वृत्तामध्ये सांगण्यात आले आहे.

Tags:    

Similar News