वैयक्तिक लाभासाठी पार्थो दासगुप्ता यांनी पदाचा गैरवापर केला

Update: 2021-01-16 08:58 GMT

एका अधिकाऱ्याने अश्या प्रकारे रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना गोपनीय माहिती देण्याचे काही कारण नव्हते. वैयक्तिक लाभासाठी बीएआरसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांनी पदाचा गैरवापर केला असून त्यांचे हे आचरण पदाचे पवित्रस्थान कलंकित करणारे असल्याचे दासगुप्ता यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जाच्या सुनावणीदरम्यान विशेष सरकारी वकील शिशिर हिरेंनी सांगितले.

'बार्क'चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पार्थो दासगुप्ता हे टीआरपी घोटाळाप्रकरणात अटकेत आहेत त्यांना न्यायालयाने १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत सुनावली आहे. त्यानंतर दासगुप्ता यांनी लगेचच जामिनासाठी अर्ज केला होता. दाखल केलेल्या जामीन अर्जाच्या सुनावणीदरम्यान, एका अधिकाऱ्याने अश्या प्रकारे रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्याशी माहिती देण्याचे काही कारण नव्हते. वैयक्तिक लाभासाठी बीएआरसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून असलेल्या पदाचा गैरवापर केला असून त्यांचे हे आचरण पदाचे पवित्रस्थान कलंकित करणारे असल्याचे विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी आज मुंबईच्या सत्र न्यायालयात म्हणाले.

दासगुप्ता ज्या संस्थेमध्ये अधिकारी आहेत ती संस्थाचा माध्यमांचे टीआरपी ठरवण्यात महत्वाची भूमिका असते. टीआरपी मध्ये वाढ झाली की थेट वाहिनीच्या महसुलात देखील मोठी वाढ होते. म्हणूनच चॅनेलने टीआरपीमध्ये वाढ करण्यासाठी फेरफार करण्याचा प्रयत्न केला आहे. अशी माहिती हिरे यांनी कोर्टाला दिली.

यावेळी न्यूज चॅनेलचा टीआरपी वाढवण्यासाठी दासगुप्तां यांनी कुशलतेने कश्या प्रकारे मदत केली याकडे लक्ष वेढणारे मुंबई पोलिसांकडून गोळा केलेले पुरावे व रिपब्लिक टीव्ही आणि बीएआरसीच्या माजी कर्मचार्‍यांमधील ईमेल व व्हाट्सएप द्वारे झालेले संभाषण देखील त्यांनी यावेळी वाचले.

दासगुप्ता यांनी चौकशीदरम्यान कबूल केले होते की टीआरपीच्या यंत्रणेविषयी त्यांना माहिती असल्याने त्यांना गोस्वामी यांनी संपर्क साधला होता आणि त्याच कारणावरून त्यांना पैसेही देण्यात आले होते. याचसोबत रिपब्लिक वाहिन्यांमधील अर्थकारणाशी निगडित असणारा प्रत्येक कर्मचारी कश्या प्रकारे बीएआरसीच्या माजी कर्मचार्‍यांशी संपर्क साधत होते हे त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले.

दासगुप्ता याची जर जामिनावर सुटका झाली तर मुंबई पोलिसांमार्फत चालू असणाऱ्या तपासात सहकार्य न करण्यासाठी कर्मचार्‍यांवर त्यांचा प्रभाव पडेल. या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल केले असले, तरी तपास अद्याप पूर्ण झालेला नसल्याचे सांगत त्यांनी जामीन अर्जाला विरोध केला.

Tags:    

Similar News