महाराष्ट्राची चेरापुंजी धरणांचा तालुका म्हटल की डोळ्यासमोर येतो तो इगतपुरी तालुका इगतपुरी तालुक्यात अनेक छोटी मोठी धरणे आहेत. महाराष्ट्रात सर्वात जास्त पर्जन्यमान इगतपुरी तालुक्यात होते. मात्र, याच इगतपुरी तालुक्यातील वाकी खापरी धरणाजवळील अतिदुर्गम भागातील खडकवाडी येथील आदिवासी बांधवांची पाण्यासाठी 4 ते ५ किलोमिटर पायपीट करावी लागत आहे. हि परिस्थिती पाहिली की हाच का तो धरणांचा तालुका ? असा प्रश्न उपस्थित होतो. जीथे आजही या महिलांना पाण्यासाठी वणवण करावं लागत आहे...