राज्य सरकारने आज राज्यातील सात IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. या मध्ये श्रावण हर्डीकर, राजेश पी पाटील यांच्यासह एस चोकलिंगम या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत.
'या' अधिकाऱ्यांचा आहे समावेश…
एस चोकलिंगम, जमाबंदी आयुक्त व संचालक भूमि अभिलेख पुणे यांची नियुक्ती महासंचालक, यशदा पुणे या पदावर
श्रावण हर्डीकर महापालिका आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी, पुणे यांची नियुक्ती नोंदणी महानिरीक्षक आणि नियंत्रक मुद्रांक शुल्क, पुणे या पदावर
राजेश पी पाटील (Odissa Cadre) आंतरराज्य प्रतिनियुक्तीने राज्य महापालिका आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी, पुणे या पदावर
शितल उगले-तेली यांची नियुक्ती संचालक, वस्त्रोद्योग, नागपूर या पदावर
प्रेरणा देशभ्रतार आयुक्त, अपंग कल्याण, पुणे यांची नियुक्ती जिल्हाधिकारी वर्धा या पदावर
अनिता पाटील भारतीय वन उपवनसंरक्षक भूमिअभिलेख, पनवेल यांची नियुक्ती सदस्य सचिव, राज्य महिला आयोग, मुंबई या रिक्त पदावर
एन के सुधांशु यांची केंद्रीय प्रतिनियुक्तीवरून राज्य शासनाकडे रुजू झाल्यानंतर, जमाबंदी आयुक्त व संचालक भूमि अभिलेख पुणे या पदावर नियुक्ती