महाराष्ट्रात वाढले वाघ

राज्यात काही दिवसांपासून वाघ चर्चेत आहे. एकीकडे शिवसेनेच्या वाघाची चर्चा असतानाच आता महाराष्ट्रात वाघांची संख्या वाढला असल्याचा अहवाल समोर आला आहे.

Update: 2023-03-02 12:03 GMT

राज्यात काही दिवसांपासून वाघ चर्चेत आहे. एकीकडे शिवसेनेच्या वाघाची चर्चा असतानाच आता महाराष्ट्रात वाघांची संख्या वाढला असल्याचा अहवाल समोर आला आहे.

महाराष्ट्रातील वनसंपदेच्या तुलनेत २०१० साली वाघांची (Tiger) संख्या ही १८० होती, ती खूप कमी असल्याचे वनविभागाने सांगितले आहे. त्यावर्षापासून वन विभागाने गांभिर्यांने वाघांचे संरक्षण व जतन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु केले आहे. आज जवळपास १३ वर्षांनी महाराष्ट्रातील वाघांची संख्या वाढून दुप्पट म्हणजे ४०० च्या वर पोहचली आहे. महाराष्ट्र वन विभागाच्या दृष्टीने वाघ संवर्धानाची ही कृती खूप अभिमानास्पद ठरली आहे. तर बिहार, राजस्थान व कंबोडिया येथून तेथील वन विभागाने वाघांच्या जोड्यांची मागणी महाराष्ट्राकडे केली आहे.



संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सहा व्याघ्र प्रकल्प आहेत. वाघांच्या (Tiger) अधिवासासाठी किंवा त्यांच्या येण्या जाण्याच्या मार्गावरही जंगल सुरक्षित रहावे यासाठी १५ कॉरिडॉर (Corridor) म्हणजे राखीव संवर्धन तयार करण्यात आले आहेत, त्याचप्रमाणे आणखी बारा कॉरिडोर लवकरच घोषित होणार आहेत. आणि १८ नवीन कॉरिडॉर (Corridor) शोधली जात आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरीपासून ते कोयनानगरपर्यत जंगलाचा पट्टा राखीव संवर्धन म्हणून घोषित करण्यात आला आहे. एखाद्या जंगलात पट्टेरी वाघ असणे, हे त्या जंगलाचे वैभव मानले जाते. त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे.

महाराष्ट्रात ताडोबा अंधारी, पेंच नागपूर, मेळघाट अमरावती, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, चांदोली कोल्हापूर, नवेगाव, नागझिरा, बोर हे सहा व्याघ्र प्रकल्प आहेत. या प्रकल्पात वाघांचे जतन व संवर्धनासाठी विशेष प्रयत्न केले जातात. या परिसरात वाघांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले जाते. वाघांच्या अधिवासावर विशेष लक्ष ठेवले जाते. वाघ हा राष्ट्रीय प्राणी आहे त्याचा रुबाबही वेगळा आहे. वाघाची चोरट्या पद्धतीने शिकार ( Shikar ) सुद्धा केली जाते. वाघाचे कातडे, त्याच्या नखांना मोठी मागणी आहे. त्यामुळे वाघांच्या अस्तित्वाची भीती ही कायम आहे.

वाघांच्या नवीन तयार होणाऱ्या १८ कॉरिडॉरमध्ये व नवीन कॉरिडॉरचे (Corridor) क्षेत्र शोधण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. यापूर्वी राधानगरी, (Radhanagari) तिलारी ते कोयना ( Koyna ) हा जंगल मार्ग वाघांसाठी राखीव व संवर्धित केलेला आहे. 

Tags:    

Similar News