कृषी कायदे रद्द! राजीव सातव यांचा व्हिडीओ व्हायरल...

Update: 2021-11-20 08:05 GMT

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी संवाद साधताना तीन कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान कृषी कायदे रद्द व्हावेत. या मागणीसाठी रस्त्यावर शेतकऱ्यांनी तर संसदेत कॉंग्रेसने जोरदार लढाई लढली होती.

त्यामध्ये दिवंगत कॉंग्रेसचे खासदार राजीव सातव यांचा देखील समावेश होता. राज्यसभेत कृषी कायद्याचा विरोध केला म्हणून 9 खासदारांना निलंबित करण्यात आले होते. त्यामध्ये राजीव सातव यांचा समावेश होता.

राजीव सातव यांनी संसदेत या तीन कृषी कायद्याचा कडाडून विरोध केला होता.

लोक तीन कृषी कायदे रद्द झाल्यानंतर राजीवजी तुम्ही आता हवे होता. असं म्हणत त्यांनी केलेल्या कामाचा गौरव करत आहेत.

राजीव सातव यांच्या ट्वीटरवरील व्हिडीओला रिप्लाय देताना राजेश म्हणतात.. राजीव सातव तुम्ही आज हवे होतात.. कृषी व्यापार कायदे जेव्हा राज्यसभेत चर्चा न करता पारित करण्यात येत होते, तेव्हा पहिल्यांदा आवाज उठवला होता. त्याचा विरोध केला होता. आज हे पाहायला तुम्ही पाहिजे होतात.

लहूभक्त साईचरणसाठे म्हणतात... भाऊ आज तुम्ही हवे होता. तुम्ही जो लढा उभा केला त्या लढ्याला आज यश आले आहे. आज तुमची आठवण आल्याशिवाय कसे राहील. केंद्र सरकारच्या या अन्यायकारक शेतकरी कायद्याच्या विरोधात आमचे आदरणीय नेते #राजीव भाऊ सातव यांनी देखील आवाज उठवला होता.

दयानंद शिंदे यांनी ट्वीटला रिप्लाय करताना अंगावर काटा येत आहे हे पाहताना.. राजीवजी तुम्ही हवा होतात.. असं ट्वीट केलं आहे.

Tags:    

Similar News