यंदा धुळेकरांच्या घरात विराजमान होणार कारागृहातील कैद्यांनी बनविलेले गणपती बाप्पा
यंदा धुळेकरांच्या घरात धुळे मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांनी बनविलेले बाप्पा विराजमान होणार आहेत. धुळे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात विविध गुन्ह्यांमध्ये शिक्षा भोगत असलेल्या बंदिजनांतर्फे गणपती बाप्पाच्या सुबक मुर्त्या बनविण्यात आल्या आहेत. आणि या मुर्त्या कारागृह प्रशासनातर्फे बाजारात विकण्यात देखील येणार आहेत. कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या बंदिजनांच्या हाताला काम मिळावे, आणि त्यांच्या कलागुणांचा वापर करून त्यांना आर्थिक नफा देखील व्हावा या उद्देशाने कारागृह प्रशासनातर्फे हा अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे.