राज्यातील कोरोनाची लाट कधी ओसरणार? राजेश टोपे यांची माहिती

Update: 2022-02-13 07:59 GMT

जालना : तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभुमीवर कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ होत होती. त्यातच दररोजची रुग्णसंख्या 50 हजारांच्या घरात पोहचली होती. मात्र कोरोना रुग्णसंख्येत सध्या मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट कधी संपणार? याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली. राजेश टोपे जालना येथे पत्रकारांशी संवाद साधत होते.

कोरोनाची तिसरी लाट कधी ओसरणार आणि राज्यातील निर्बंध कधी हटवण्यात येतील, असे प्रश्न नागरीकांच्या मनात पडले आहेत. त्यामुळे जालना येथे राजेश टोपे यांना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत प्रश्न विचारले असता त्यांनी सांगितले की, मार्चच्या मध्यापर्यंत कोरोनाची तिसरी लाट ओसरेल. तसेच गेल्या महिन्यात 48 हजारापर्यंत पोहचलेल्या रुग्णसंख्येत सध्या मोठ्या प्रमाणावर घसरण झाली आहे. त्यामुळे राज्यात लावण्यात आलेले कोरोना निर्बंधही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून लवकरच हटवण्यात येतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

यावेळी बोलताना राजेश टोपे यांनी सांगितले की, राज्यात मास्कमुक्ती केली जाणार नाही. तर मास्कबाबत कोणताही निर्णय घेतला जाणार नाही. मात्र ज्याप्रमाणे परिस्थिती निर्माण होईल त्याप्रमाणे परिस्थितीनुसार निर्णय घेतले जातील. तसेच कोरोनाची तिसरी लाट ओसरायला सुरूवात झाली असली तरी नागरीकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले.

ज्या नागरीकांनी कोरोना लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतला नसेल तर त्यांनी लसीकरण करून घ्यावे. राज्यातील नागरीकांचे 100% लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे, असे मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभुमीवर कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ होत होती. त्यातच दररोजची रुग्णसंख्या 50 हजारांच्या घरात पोहचली होती. मात्र कोरोना रुग्णसंख्येत सध्या मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट कधी संपणार? याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली. राजेश टोपे जालना येथे पत्रकारांशी संवाद साधत होते.

कोरोनाची तिसरी लाट कधी ओसरणार आणि राज्यातील निर्बंध कधी हटवण्यात येतील, असे प्रश्न नागरीकांच्या मनात पडले आहेत. त्यामुळे जालना येथे राजेश टोपे यांना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत प्रश्न विचारले असता त्यांनी सांगितले की, मार्चच्या मध्यापर्यंत कोरोनाची तिसरी लाट ओसरेल. तसेच गेल्या महिन्यात 48 हजारापर्यंत पोहचलेल्या रुग्णसंख्येत सध्या मोठ्या प्रमाणावर घसरण झाली आहे. त्यामुळे राज्यात लावण्यात आलेले कोरोना निर्बंधही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून लवकरच हटवण्यात येतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

यावेळी बोलताना राजेश टोपे यांनी सांगितले की, राज्यात मास्कमुक्ती केली जाणार नाही. तर मास्कबाबत कोणताही निर्णय घेतला जाणार नाही. मात्र ज्याप्रमाणे परिस्थिती निर्माण होईल त्याप्रमाणे परिस्थितीनुसार निर्णय घेतले जातील. तसेच कोरोनाची तिसरी लाट ओसरायला सुरूवात झाली असली तरी नागरीकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले.

ज्या नागरीकांनी कोरोना लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतला नसेल तर त्यांनी लसीकरण करून घ्यावे. राज्यातील नागरीकांचे 100% लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे, असे मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले. 

Full View

Tags:    

Similar News