अंधेरी पुर्व येथे आज मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली आहे. चाकाला परिसरात रामबाग सोसायटीमध्ये हि दरड पहिल्या मजल्यावर असलेल्या चार ते पाच फ्लॅट वर कोसळून घरांचे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेमध्ये जीवितहानी झालेली नसून मात्र 5 घरांचं मोठा नुकसान झालं आहे. यावर आता आमदार ऋतुजा लटके यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आमदार लटके म्हणाल्यात की " तेथील लोकांची स्थलांतराची कोणतीही सोय आतापर्यंत झालेली नाही. जेव्हा एखाद्या लोकप्रतिनिधीचं पत्र जातं. तेव्हा त्यांना उत्तर हे लवकरात लवकर देणं गरजेचं असतं. परंतु अद्याप ही अधिकाऱ्यांकडून उत्तरं देखील मिळालेलं नसल्याची प्रतिक्रिया आमदार लटके यांनी दिली आहे.