मशीद तोडून मंदिर बांधलं जात असेल तर समर्थन नाही.. उदयनिधी स्टॅलिन यांच वादग्रस्त वक्तव्य
उदयनिधी स्टॅलिन (Udhayanidhi Stalin)यांनी केलेल्या नव्या वक्तव्यामुळे वाद होण्याची शक्यता आहे. "मशीद तोडून तिथे मंदिर बांधलं जात असेल, तर त्याचं आम्ही समर्थन करू शकत नाही," असं विधान उदयनिधी स्टॅलिन यांनी गुरूवारी केलं
योध्येतील राम मंदिराचे २२ जानेवारीला प्रभू रामलल्लाचे प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. अशातच तमिळनाडूचे (TAMILNADU) मंत्री उदयनिधी स्टॅलिन (Udhayanidhi Stalin)यांनी केलेल्या नव्या वक्तव्यामुळे वाद होण्याची शक्यता आहे. "मशीद तोडून तिथे मंदिर बांधलं जात असेल, तर त्याचं आम्ही समर्थन करू शकत नाही," असं विधान उदयनिधी स्टॅलिन यांनी गुरूवारी केलं आहे.
स्टॅलिन नेमकं काय म्हणाले?
"द्रमूक (DMK) कुठल्याही धार्मिक श्रद्धेच्या विरोधात नाही. पण, मशीद तोडून तिथे मंदिर बांधलं जात असेल, तर त्याचं आम्ही समर्थन करू शकत नाही," असं विधान उदयनिधी स्टॅलिन यांनी माजी मुख्यमंत्री, दिवंगत नेते एम. करूणानिधी (M.Karunanidhi) यांचा उल्लेख करत केलं आहे.
सनातन धर्माविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं
उदयनिधी त्यांच्या सनातनविरोधी वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. गेल्या वर्षी त्यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यू आणि कोरोना व्हायरसशी केली होती. उदयनिधी म्हणाले होते की, सनातन धर्म हा डेंग्यू, मलेरिया आणि कोरोनासारखा आहे, ज्याचा नुसता विरोध होऊ शकत नाही, तर त्याचा नायनाट करण्याची गरज आहे." सनातनविरोधी वक्तव्यानंतर आता उदयनिधी स्टॅलिन यांनी राम मंदिराविषयी वादग्रस्त विधान केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाची सुरूवात होण्याची शक्यता.