TMC च्या महुआ मोईत्रा यांना दिलासा नाही

Update: 2024-01-03 10:58 GMT

आज झालेल्या सुनावणीत, सर्वोच्च न्यायालयाने तृणमूल काँग्रेस (TMC) च्या खासदार महुआ मोईत्रा यांना संसदेतून हकालपट्टीला आव्हान देणाऱ्या याचिकेत अंतरिम दिलासा नाकारला. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीसाठी मार्चमध्ये पुढील तारीख निश्चित आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने लोकसभा सचिवालयाला एक नोटीस जारी करून म्हणणं मांडण्यासाठी सांगितलं आहे.

अदानी समूहावर आरोप लावणाऱ्या महुआ मोईत्रा यांना संसदेच्या नितीमत्ता समितीने दोषी ठरवत बडतर्फ करण्याची शिफारस केली होती. त्यानुसार लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी महुआ मोईत्रा यांना बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला होता. एकीकडे महुआ मोईत्रा यांना दिलासा नाकारला गेला असतानाच दुसरीकडे आजच्याच दिवशी सर्वोच्च न्यायालयाने अदानी समूहाच्या चौकशीसाठी एसआयटी ची मागणी फेटाळत अदानी समूहाला मोठा दिलासा दिला आहे.

महुआ मोईत्रा यांनी हिंडनबर्ग रिपोर्ट नंतर वादात सापडलेल्या अदानी समूहाच्या गैरव्यवहारांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी लोकसभेत केली होती. मात्र या मागणीवर उत्तर देण्याएवजी भाजपने महुआ मोईत्रा यांनी आपल्या लोकसभा पोर्टल च्या लॉगीनची गोपनीय माहिती हिरानंदानी यांना दिल्याचा आरोप लावत त्यांना बडतर्फ करण्याची मागणी लावून धरली. अखेरिस महुआ मोईत्रा यांना बडतर्फ करण्यात आले. या प्रकरणी दिलासा मिळावा म्हणून महुआ मोईत्रा यांनी न्याायालयात दाद मागितली, मात्र न्यायालयाने त्यांना दिलासा दिला नाही, पुढील सुनावणी ऐक लोकसभा निवडणुकांच्या धामधूमीत लावण्यात आल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

अदानी समूहाला दिलासा आणि महुआ मोईत्रा यांना तारिख असे दोन निर्णय एकाच दिवशी आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर महुआ मोईत्रा यांनी एक ट्वीट करून आजच्या कामकाजाची माहिती दिली आहे.


दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर अदानींनीही ट्वीट करत सत्यमेव जयते चा नारा दिला आहे.

Tags:    

Similar News