मुंबई// मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय जनता दल आणि मुस्लिम लीग सोबत आघाडी करणार असल्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. हा एआयएमआयएमला जोरदार धक्का मानला जात आहे.
जानेवारीच्या मध्यापर्यंत तिन्ही पक्ष मिळून जागावाटप जाहीर करणार असल्याचं आंबेडकर यांनी सांगितले. यासोबत आमच्यासोबत आणखी काही पक्ष देखील येणार असल्याचे त्यांनी म्हटले.
तसंच उद्यापासून वंचित बहुजन आघाडी प्रचाराला सुरुवात करणार आहे. काँग्रेसच्या मनात वंचित बहुजन आघाडीची भीती असून आम्ही काँग्रेससोबत युतीचे पर्याय खुले ठेवल्याचंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.आम्ही शिवसेना सोबत पर्याय म्हणून पुढे येऊ मात्र ते वंचितला सोबत घेतील का ? हे बघण महत्वाचं असेल असं आंबेडकर म्हणालेत.
सोबतच AIMIM आमच्यासोबत नसून ते आमच्यासोबत नाराज आहेत,असं आंबेडकर म्हणालेत. राजकारण हे रिलीजीयस पध्दतीनं व्हावं हा आमचा हेतू नाही. काँग्रेसचा पर्याय तेव्हाही होता आजही खुला आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. मात्र पालिकेच्या निवडणुकीत आम्ही एकत्र नाहीत अजून AIMIM सोबत स्पष्टता नाही,असंही ते म्हणालेत.