Up Election: दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात, योगी सरकारच्या 'या' मंत्र्यांची प्रतीष्ठा पणाला

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी ५५ जागांवर आज मतदान पार पडत आहे. या दुसऱ्या टप्प्यात ५८६ उमेदवार मैदानात असून सुमारे २ कोटी मतदार १७,००० मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

Update: 2022-02-14 03:18 GMT

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी ५५ जागांवर आज मतदान पार पडत आहे. या दुसऱ्या टप्प्यात ५८६ उमेदवार मैदानात असून सुमारे २ कोटी मतदार १७,००० मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

२०१७ च्या निवडणूकीत भाजपने आज मतदान होत असलेल्या ५५ जागांपैकी ४० जागांवर विजय मिळवला होता. तर समाजवादी पार्टीने १३ जागांवर, बसपाने २ जागांवर विजय मिळवला होता. आज मतदान होत असलेल्या ५५ मतदार संघावर मुस्लीम मतदारांची संख्या अधिक आहे. हा वर्ग सपाच्या मागे नेहमीच उभा राहताना पाहायला मिळतो.

दुसऱ्या टप्प्यात सहारनपुर, बिजनौर, मुरादाबाद, संभल, रामपुर, अमरोहा, बदायूं, बरेली आणि शाहजहांपुर जिल्ह्यांमध्ये मतदान पार पडत आहे. या जिल्ह्यामधील बेहट, नकुड़, देवबंद, गंगोह, बिजनौर, मुरादाबाद ग्रामीण आणि मुरादाबाद नगर, चंदौसी, संभल, रामपुर, हसनपुर, बदायूं, बरेली, आंवला, जलालाबाद या मतदारसंघात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला…

योगी सरकार मधील मंत्री डॉ. धर्म सिंह सैनी नकुड़ मतदारसंघातून उभे आहेत. तर माजी मंत्री मोहम्मद आजम खां रामपुर मधून आपलं नशीब आजमावत आहेत. त्यांचा मुलगा स्वार मतदार संघातून निवडणूकीच्या मैदानात उतरला आहे.

संभल मतदार संघातून माजी मंत्री इकबाल महमूद आणि अमरोहा मतदारसंघातून माजी मंत्री महबूब अली निवडणूकीच्या मैदानात उतरले आहेत. बरेली कैंट मतदारसंघातून सुप्रिया ऐरन निवडणूकीच्या मैदानात उतरल्या आहेत.

याशिवाय शाहजहांपुर मतदारसंघातून अर्थ मंत्री सुरेश खन्ना, बिलासपुर मतदारसंघातू जलशक्ति राज्य मंत्री बलदेव सिंह औलख, बदायूं मतदारसंघातून नगर विकास राज्य मंत्री महेश चन्द्र गुप्ता, चंदौसी मतदारसंघातून राज्यमंत्री गुलाब देवी निवडणूकीच्या मैदानात आहेत.

10 फेब्रुवारीला पहिल्या टप्प्यासाठी मतदान पार पडले. पहिल्या टप्प्यात सपा रालोद-गठबंधन ला मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याचं बोललं जात आहे. तर भाजप चे नेते भाजपला मतदान मिळाल्याचा दावा करत आहेत.

उत्तर प्रदेशमध्ये 7 टप्प्यात मतदान पार पडत आहे आणि 10 मार्च ला निवडणूकीचे निकाल हाती येणार आहे.

Tags:    

Similar News