पंतप्रधानांनी पुढे येऊन 'हे विष पसरण्यापासून रोखायला हवे'- नसरुद्दीन शाह
भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपुर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्याचे पडसाद आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटले. त्यानंतर भाजपने नुपुर शर्मा यांना सहा वर्षासाठी निलंबित केले. या घटनेवर अभिनेते नसरुद्दीन शाह यांनी प्रतिक्रीया दिली आहे.;
भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपुर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्याचे पडसाद आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटले. त्यानंतर भाजपने नुपुर शर्मा यांना सहा वर्षासाठी निलंबित केले. या घटनेवर अभिनेते नसरुद्दीन शाह यांनी प्रतिक्रीया दिली आहे.नुपुर शर्मा यांनी एका वृत्तवाहिनीवरील चर्चेत प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त केले. या वक्तव्याचे जगभरात पडसाद उमटले. तर भारताने माफी मागावी, असे मत कतारने व्यक्त केले. त्यापार्श्वभुमीवर जगभरात भारताची प्रतिमा मलिन होत असताना ज्येष्ठ अभिनेते नसरुद्दीन शाह यांनी एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीला प्रतिक्रीया दिली आहे.
नसरुद्दीन शाह म्हणाले की, भाजप प्रवक्त्या नुपुर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्यानंतर सरकारने या प्रकरणावर बोलण्यासाठी एक आठवडा लावला. तोपर्यंत पाकिस्तान, अफगाणिस्तानसारख्या देशांनी भारतावर निशाणा साधला होता. तसेच पुढे बोलताना नसरुद्दीन शाह म्हणाले की, नुपुर शर्मा या फ्रिंज एलिमेंट नाहीत तर त्या भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या आहेत. तसेच मला एक रेकॉर्डिंग दाखवा. ज्यामध्ये मुस्लिमांनी हिंदू देव देवतांविषयी अशा प्रकारे वक्तव्य केले आहे, असे आव्हान शाह यांनी दिले.
त्यापुढे शाह म्हणाले, मला असं वाटत आहे की, आता वेळ आली आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढे येऊन पसरणारे विष रोखायला हवे. तर दोन्ही बाजूंनी अशा प्रकारावर तीव्र प्रतिक्रीया येतात. याला सोशल मीडिया जबाबदार आहे. त्यामुळे माध्यमांनीही जबाबदारीने वागायला हवे, असा सल्ला शाह यांनी दिला.