कापूस खरेदीचा श्रीगणेशा 7 हजारांवर, गेल्या वर्षी होता 10 हजारापेक्षा जास्त भाव....

Update: 2024-09-13 10:56 GMT

खांदेशातील कॉटन मार्केट साठी प्रसिद्ध असलेल्या धरणगाव येथ गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) मुहूर्तावर दर वर्षी प्रमाणे कापूस खरेदीस प्रारंभ (Cotton Market) करण्यात आला. कापूस काटा पूजणाच्या पहिल्याच दिवशी कापसाला ७ हजार १५३ रुपये प्रतिक्विंटल एवढा भाव मिळाला आहे.

धरणगाव येथील शेतकरी अधिकार पुंडलिक पाटील या शेतकऱ्याचा कापूस पहिल्यांदा मोजण्यात आला. गेल्या वर्षीच्या कापूस खरेदी हंगाम मुहूर्ताला प्रति क्विंटल 10 हजारांपेक्षा जास्त भाव मिळाला होता त्या तुलनेत यंदा मुहूर्ताला तीन हजारांनी कमी भाव मिळाला आहे.

श्रीजी जिनिंगमध्ये दिवसभरात २४०० क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. जुन्या कापसाला ८ हजार रुपये आणि कवडीमालाला ५ हजारांपेक्षा जास्त भाव मिळणार आहे.

गेल्या वर्षी मुहूर्ताला 10 हजारांपेक्षा जास्त भाव -

खांदेशातील जिनींग उद्योजकांनी दर वर्षी गणेश उत्सवाच्या शुभ मूहूर्तावर कापूस खरेदीचा ‘श्री गणेशा’ करतात. उन्हाळी कापूस गणेश उत्सवाच्या दरम्यान निघायला सुरवात होते. त्यात सर्वाधिक कापूस खरेदीचा मान येथील श्री जीजिनींग अ‍ॅण्ड प्रेसिंग ने मिळविला. दरम्यान गेल्यावर्षी गणेश उत्सवाच्या मुहूर्तावर कापसाला प्रति क्विंटल 10 हजारापेक्षा जास्त भाव मिळाला होता. कपासाला चांगला भाव मिळणार असे संकेत असतांना नंतर मात्र कापसाचे भाव प्रचंड खाली आले. नंतर चांगला कापूसाला 8 हजार ते 9 हजार भाव मिळाला तर त्यापेक्षा हलक्या प्रतीच्या कापसाला 7 हजाराच्या आसपास भाव मिळाला होता.कापसाचे भाव वाढतील म्हणून अनेक शेतकऱ्यांनी कापुसच विक्रीला काढला नाही घरातच ठेवला. नंतर मात्र आहे त्या भावात विक्रीला काढावा लागला होता.

अंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला यंदा मागणी -

यंदा अति पाऊसामुळे कापसाला थोडा फटका बसला असला तरी हंगाम चांगला जाण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. यावर्षीचा राज्यातील काही जिल्ह्यातील कापसाचा हंगाम कमी जास्त प्रमाणात राहण्याची शक्यता आहे. मात्र, जागतिक परिस्थिती बघता आणि गुजरात व तेलंगणामधील पूरस्थिती बघता कापसाचे भाव साडेआठ ते नऊ हजार रुपयां पर्यंत जाण्याची शक्यताही कापूस व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

यंदा कापसाला अंतराष्ट्रीय बाजारात चांगली मागणी असेल असही जाणकारांच मत आहे....

Tags:    

Similar News