संसद भवनाच्या उद्घाटनाला विरोध म्हणजे दुबळेपणा - देवेंद्र फडणवीस
काँग्रेस सरकारच्या काळात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी अनेक उद्घाटन सोहळ्यात सहभाग नोंदवला आणि उद्घाटनही केलं. मग पंतप्रधानांच्या हस्ते होणाऱ्या नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्याला विरोध का? असा सवाल फडणवीस यांनी विचारला आहे.
28 मे रोजी नव्या संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या उद्घाटन सोहळ्याला काँग्रेससह 19 पक्षांचा विरोध आहे. नव्या संसदेचे उद्घाटन हे पंतप्रधानांच्या हस्तेच का? असा सवाल विरोधी पक्ष नेत्यांनी उपस्थित केलायं. यावर भाजपचे उपमुख्यमंत्री फडणवींस यांनी उत्तर दिले आहे. ज्यांचा लोकतंत्रावर विश्वास नाही असेच पक्ष आणि नेते या उद्घाटन सोहळ्याला विरोध करत आहे. राष्ट्रपतींच्याच हस्ते उद्घाटन व्हावे असा हट्ट का?
महाराष्ट्राच्या विधान भवनाचे उद्घाटन इंदिरा गांधी यांनी केलं होत. राजीव गांधी यांनी संसदेच्या लायब्ररीचे उद्घाटन केले होत, तामिळनाडूच्या विधानभवनाच्या उद्घाटनाच्या वेळेस सोनिया गांधी होत्या. नितीश कुमार यांनी बिहारच्या विधान भवनाच्या सेंट्रल हॉलचे उद्धघाटन केलं होतं तेव्हा देखील राज्यपालांना बोलवलं नाही. असे प्रश्न फडणवीसांनी विरोधकांना विचारले आहेत. आणि संसद भवनेच्या उद्घाटनाला विरोध करणे म्हणजे दुबळेपणाचा प्रतीक आहे असे देखील म्हणाले आहे.