बाळाला गिळायला आला अजगर

भक्षाच्या शोधात आलेल्या सापाने बाळाला गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला. आईने जे केले ते पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान....;

Update: 2023-09-17 11:01 GMT

काळ आला होता पण वेळ आलेली नव्हती अशी एक म्हण ग्रामीण भागात प्रचलित आहे. या म्हणीचा प्रत्यय नांदेडच्या  या लहान गावात आला. पूजा वाकोडे आणि त्यांचे कुटुंब शेतातील घरात झोपलेले होते. त्यांच्यासोबत त्यांचे दीड वर्षाचे बाळ देखील झोपलेले होते. झोपेत असलेल्या पूजा वाकोडे यांच्या पायाला गारवा लागल्याने त्यांनी डोळे उघडले तर समोर भला मोठ्ठा अजगर त्यांच्या बाळाच्या दिशेने जात होता..

हा अजगर भक्षाच्या शोधात मुलाला गिळण्यासाठी आला असल्याचा अंदाज कपिल वसुरे यांनी व्यक्त केला. सर्प मित्राला बोलवल्यानंतर त्यांनी त्या अजगराला पकडून वन विभागाच्या मार्गदर्शनात त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले आहे. आईच्या तत्परतेने आपल्या बाळाच्या जीवावर आलेले हे जीवघेणे संकट त्याच्या आईने सर्प मित्राच्या मदतीने परतऊन लावले आहे. या घटनेत बाळ आणि अजगर दोघानाही जीवदान मिळाले आहे. 


Full View


Tags:    

Similar News