एक आदर्श आमदार म्हणून दिवंगत गणपतराव देशमुख स्मरणात राहातील – चव्हाण
एक आदर्श व्यक्तीमत्व आणि आदर्श आमदार म्हणून दिवंगत गणपतराव देशमुख हे कायम आठवणीत राहतील असं व्यक्तव्य मा.आ. विद्या चव्हाण यांनी केले आहे.;
मुंबई : एक आदर्श व्यक्तीमत्व आणि आदर्श आमदार म्हणून दिवंगत गणपतराव देशमुख हे कायम आठवणीत राहतील असं व्यक्तव्य मा.आ. विद्या चव्हाण यांनी केले आहे. मॅक्स महाराष्ट्रशी बोलतांना त्यांनी या भावना व्यक्त केल्या आहेत.
गणपतराव देशमुख हे 11 वेळेला आमदार म्हणून निवडून आले. यावरूनच त्यांच्या कामाचा आवाका आपल्याला आल्याशिवाय राहत नाही. एवढे मोठे नेते असताना देखील त्यांची राहणी अतिशय साधी होती. ते अतिशय मनमिळावू होते. त्यांच्या जाण्याने राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाल्याची भावना चव्हाण यांनी व्यक्त केली.
मी जेंव्हा आमदार होते तेंव्हा एक आदर्श आमदार काय असतो याची प्रचिती मला त्यांच्या कामावरून वारंवार यायची. मी जवळपास 30 वर्षांपासून त्यांना ओळखते त्यांनी अनेक चळवळीमध्ये मोठे योगदान दिले आहे.
सभागृहात काम करत असताना ते आपल्या मतदार संघातीलच नाही तर सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे प्रश्न अतिशय प्रभावीपणे मांडत असतं. त्यांच्या भाषण कौशल्याने अनेक जण प्रभावित होत. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राचा एक आदर्श नेत्या हरपला आहे. त्यांनी आपल्याला जे संस्कार घालून दिलेले आहेत, ते आपण पुढे घेऊन गेलं पाहिजे हिच खरी त्यांच्यासाठी श्रध्दाजंली ठरेल असं विद्या चव्हाण यांनी म्हटलं आहे.