The Kashmir Files: राजस्थानमध्ये दलित तरूणाला जमिनीवर नाक रगडण्यास भाग पाडले...

Update: 2022-03-24 09:48 GMT

देशात सध्या The Kashmir Files या चित्रपटाची चांगलीच चर्चा सुरु आहे. मात्र, राजस्थानमध्ये एका दलित तरुणाला 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटाबाबत फेसबुकवर पोस्ट लिहिणं चांगलंच महागात पडलं. राजेश कुमार मेघवाल असे या दलित तरुणाचे नाव असून त्याने 18 मार्च ला फेसबुकवर या चित्रपटाबाबत पोस्ट केली होती.

या संदर्भात The Indian Express ने वृत्त दिलं आहे..

फेसबुकवर पोस्ट लिहिल्यानंतर काही लोकांनी त्यांच्या पोस्टवर धार्मिक कमेंट केल्या होत्या. त्याला धमक्या दिल्या गेल्या आणि माफी मागण्यास सांगितले. तसंच गावातील गावकऱ्यांनी आणि माजी सरपंचाने गावातील मंदिरात माफी मागण्यास भाग पाडले. त्याला मारहाण करण्यात आली आणि मंदिराच्या फरशीवर जबरदस्तीने नाक घासण्यास भाग पाडले. गावकऱ्यांनी त्याच्या सोबत असं काही केलं जाणार नाही. यांचं आश्वासन दिलं होतं. मात्र, त्यांना सर्वासमोर नाक रगडण्यास भाग पाडले होते.

काश्मिरी पंडितांवरील अत्याचारावर आधारीत 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावरही याबाबत चर्चा सुरू आहे. मेघवाल यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी बेहरोर पोलिस ठाण्यात एट्रोसिटी अँक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यात 11 व्यक्तींवर आरोप करण्यात आले आहेत. यातील 7 जणांना बुधवारी अटक करण्यात आली आहे.

मेघवाल यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत गुन्हा दाखल झाल्यापासून ते प्रचंड दबावाखाली आहे. त्यांना भीती वाटत आहे. अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अजय कुमार शर्मा, संजीव कुमार, हेमंत शर्मा, प्रवीण कुमार, राम अवतार, नितीन जांगीड आणि दयाराम अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. दुसरीकडे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु असल्याचं म्हटलं आहे.

Tags:    

Similar News