सिंगापुरमध्ये काश्मीर फाईल्सवर बंदी

विवेक अग्निहोत्री यांनी दिग्दर्शिक केलेला काश्मीर फाईल्स हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून वादात सापडला आहे. त्यातच हा चित्रपट धार्मिक ध्रुवीकरणासाठी वापरला जात असल्याची टीका केली जात आहे. त्यापार्श्वभुमीवर सिंगापूरमध्ये काश्मीर फाईल्स चित्रपट प्रदर्शित करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.;

Update: 2022-05-12 04:12 GMT

कश्मीर फाईल्स या चित्रपटात 90 च्या दशकातील काश्मीरमधून हिंदू पंडितांचे झालेले पलायन दाखवण्यात आले आहे. त्यातच काश्मीर फाईल्स चित्रपटावरून देशात दोन गट पडले आहेत. त्यापार्श्वभुमीवर सिंगापूर सरकारने काश्मीर फाईल्स चित्रपटावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत द वायर ने वृत्त दिले आहे.

सिंगापूरने या चित्रपटावर बंदी घालताना म्हटले आहे की, सिंगापूरमध्ये विविध धर्माचे लोक राहतात. त्यामुळे या चित्रपटामुळे सिंगापुरमधील धार्मिक समुदायांमध्ये शत्रुत्व निर्माण होऊ शकते. त्यामुळे विविध समुदायांमधील सामाजिक सौदार्ह्य आणि एकता आम्हाला बिघडू द्यायची नाही. त्यामुळेच सिंगापूरच्या चित्रपट कायद्यानुसार काश्मीर फाईल्स चित्रपटावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

विवेक अग्निहोत्री यांनी दिग्दर्शित केलेल्या काश्मीर फाईल्स चित्रपट 11 मार्च रोजी प्रदर्शित झाला होता. त्यानंतर देशात नवा वाद पेटला. तर हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण करण्याचा डाव आखण्यात आला, अशी टीका विरोधी पक्षांनी केली. तर दुसरीकडे देशाचे पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपने या चित्रपटाचे जोरदार समर्थन केले. त्यातच भाजपने विविध राज्यांच्या सरकारांकडे हा चित्रपट मोफत दाखवण्याची मागणी केली. तर काही राज्य सरकारांनी आपल्या कर्मचाऱ्यांना हा चित्रपट पाहण्यासाठी सुटी घोषित केली. मात्र विरोधी पक्षांनी केलेल्या टीकेनंतर विवेक अग्निहोत्री यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली. मात्र सिंगापूर सरकारने काश्मीर फाईल्स चित्रपट प्रदर्शित करण्यास विरोध दर्शवल्यामुळे हा काश्मीर फाईल्सला विरोध दर्शवला जात आहे.

Tags:    

Similar News