सवतीच्या भुताने केला खून, गडचिरोलीत अजब तक्रार

एका महिलेचा खून तिच्या पतीच्या मृत पत्नीच्या भुताने केल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आणि पोलीसही चक्रावले काय आहे गडचिरोलीतील प्रकार वाचा सविस्तर...;

Update: 2023-05-23 02:15 GMT

गडचिरोली जिल्यातील भामरागड तालुक्यात एक अजब घटना आहे.कल्पना विलास कोठारे या महिलेने आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याची फिर्याद लाहेरी पोलीस स्टेशनला प्राप्त झाली होती. ही फिर्याद मृत महिलेच्या पतीने दिली होती. तक्रार दाखल झाल्यानंतर ही आत्महत्या नसून खून असल्याचा संशय पोलिसांना आला होता.

यानुसार अनेक अंगांनी तपास करून देखील या गुन्ह्याचा तपास होत नव्हता. पोलिसांनी नातेवाईक तसेच गावातील इतर नागरिकांकडे चौकशी केली असता त्यांना अजबच माहिती मिळाली. त्यांनी हा खून तिच्या पतीच्या मृत असलेल्या पहिल्या पत्नीने तिच्या अंगात घुसून केल्याची माहिती पोलिसांना दिली.त्यांनी सदर प्रकरणात आमचा कुणावर संशय नसल्याचे देखील सांगितले.

या सर्व प्रकारामुळे पोलीस संभ्रमात होते. तरीही पोलिसांनी तपास सुरु ठेवला. प्रथमदर्शी पुरावे जमा करत काही साक्षीदारांना तपासत पोलिसांनी या खुन्यांचा तपास लावला. कल्पना यांच्या राईसमिलमध्ये कामास असलेल्या गुड्डू गावडे याने गळा दाबून या महिलेचा खून केल्याचे निष्पन्न झाले. खून करून त्याने या महिलेला दोरीच्या साहाय्याने झाडाला अडकउन ठेवले. पोलिसांनी या जटील गुन्ह्याचा यशस्वी तपास करत आरोपीला जेरबंद केले.



 

याबाबत प्राथमिक तपास अधिकारी संतोष काजळे सांगतात “ लाहेरी सारख्या अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागात वैज्ञानिक पुराव्यांची माहिती जमा करणे खूप कठीण काम आहे. या परिसरात जादूटोणा भूत प्रेत यासारख्या अंधश्रद्धांचा पगडा असल्याने आरोपी सहजपणे गुन्हा करून मोकाट फिरतात. पोलिसांच्या मदतीकरिता साक्षीदार म्हणून कुणी उभा राहत नाही. याबरोबरच वैयक्तिक द्वेषातून झालेले खून देखील नक्षल्यांच्या नावाखाली भरकटून जातात. हे गुन्हेगार कायद्याच्या कचाट्यातून देखील दूर राहतात. यापुढे असे प्रकार घडणार नाहीत याची आम्ही काळजी घेत आहोत”.

Tags:    

Similar News