मुलीचे प्रेम संबंध कळले,बापाने पोटच्या मुलीचा….

मुलीच्या प्रेमसंबंधावर चिडून सांगली जिल्ह्यातील या गावातील निर्दयी बापाने केलेले कृत्य वाचून तुम्हालाही येईल संताप…

Update: 2023-07-02 14:13 GMT

सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात असणाऱ्या मंगरूळ(चिंचणी) या गावात धक्कादायक घटना घडली आहे. मुलीच्या प्रेमसंबंधाची माहिती कळाल्यावर निर्दयी बापाने पोटच्या मुलीचा चाकू भोकसून खून केला आहे. संतोष जगन्नाथ जाधव असे या क्रूर बापाचे नाव असून त्याच्यावर त्याच्याच मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत श्रेया संतोष जाधव ही केवळ सतरा वर्षाची होती. तिचे प्रेमसंबंध असल्याच्या कारणाने चिडून त्याने घरातील भाजी कापण्याचा चाकू तिच्या डाव्या छातीच्या वर भोकसला. उपचारादरम्यान श्रेयाचा मृत्यू झाला आहे. पुढील तपास विटा पोलीस करत आहेत.

Tags:    

Similar News