साताऱ्यात लाचलुचपत विभागाने मोठी कारवाई केली आहे. शरमेची बाब म्हणजे ५ लाखांची लाच घेताना साताऱ्याचा न्यायाधीशच रंगेहात सापडला आहे. न्यायाधीशासह इतर तिघांवर मोठी कारवाई झाली आहे.
जामीन देण्यासाठी ५ लाखांची मागणी करण्यात आल्याची तक्रार लाचलुचपत विभागाकडे प्राप्त झाली होती. या तक्रारीची खात्री केल्यानंतर तीन संशयित आरोपी एसीबीच्या जाळ्यात अलगद सापडले. यामध्ये जिल्हा व
सत्र न्यायालयाचा न्यायाधीश धनंजय निकम याचा समावेश आहे. तर आनंद मोहन खरात आणि किशोर संभाजी खरात अशी इतर
आरोपींची नावे आहेत. सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग
आणि पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही संयुक्त कारवाई केली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.