संविधान समता दिंडीच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन 'विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म' हा भाव मनी ठेवून लाखो वारकरी पंढरीकडे वाटचाल करीत आहेत. संतांनी सामाजिक समतेचा झेंडा पंढरपूरच्या वाळवंटात रोवला आणि सामाजिक विषमतेच्या विरोधात विद्रोह केला. 'वारी' हा त्यामुळेच महाराष्ट्राचा सामाजिक, सांस्कृतिक आणि तसा खरा अध्यात्मिक सोहळा ठरला आहे. संविधानातील मूल्ये आणि संतविचार हे परस्पराला पूरक आहे.हा विचार या पालखी सोहळ्यातून समजून घेण्यासाठी, या दिंडीचे आयोजन केलेले जाते.