उद्यापासून लोकसभेच्या निवडणूकीची आचारसंहिता जाहीर...!

निवडणूक आयोगाची लोकसभेच्या निवडणूकांसंदर्भात शुक्रवारी बैठक झाली. यामध्ये निवडणूक उद्या दुपारी ३ वाजता जाहीर करण्यात येणार असून त्यानंतर आचारसंहिता लागू होणार आहे.

Update: 2024-03-15 09:30 GMT

लोकसभेच्या निवडणूकांसंदर्भात महत्वाचे निर्णय आणि चर्चा घडवून आणण्यासाठी निवडणूक आयोगाकडून आज शुक्रवारी बैठक घेण्यात आली. १६ मार्च रोजी दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद घेण्यात येईल असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला असून उद्या शनिवारी ३ च्या नंतर आचारसंहिता लागणार आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणूकीचं मतदान हे एकूण सात टप्प्यात झाले होते पण यावेळी देशभरात हे मतदान सात किंवा आठ टप्प्यात होण्याची शक्यता आहे, तर महाराष्ट्रातील ४८ जागांसाठी दोन टप्प्यात मतदान होण्याची शक्यता आहे.

आदर्श आचारसंहितेबाबत महत्वाचे मुद्दे :

१) लोकसभा निवडणूकीमुळे आता संपूर्ण देशात आदर्श आचारसंहिता लागू असणार आहे.

२) निवडणूक आयोगाकडून निवडणूकांच्या तारखा जाहीर होताच आदर्श आचारसंहिता लागू होते.

    त्यानंतर आचारसंहिता निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत असते.

३) आचारसंहिता कोणत्याही कायद्याचा आधार घेऊन तयार केली गेली नाही.

४) सर्वच राजकीय पक्षांची मत आणि तज्ज्ञांचे मत घेऊन ही आचारसंहिता तयार केली आहे.

) आचारसंहितेमध्ये काळानुरुप वेळोवेळी बदलही केले जाऊ शकतात.

६) 1960 मध्ये देशात पहिली आचारसंहिता झाली होती. केरळच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान ही लागू करण्यात आली होती.

आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास होऊ शकते कठोर कारवाई

कोणत्याही उमेदवाराकडून किंवा एखाद्या राजकीय पक्षाकडून आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई केली जाते. निवडणूक आयोग राजकीय पक्ष किंवा निवडणूक लढवण्याऱ्या उमेदवाराविरोधात फौजदारी खटला दाखल करु शकतो किंवा निवडणूक लढवण्यापासून थांबवू शकतो. आचारसंहितेचं उल्लंघन झाल्याचे सिद्ध झाल्यास तुरुंगवासाची शिक्षा होते. या काळात सामान्य मतदारांवर दबाब आणणे, त्यांना धमक्या देणे या गोष्टी आदर्श आचारसंहितेचा भंग करणाऱ्या आहेत. यासंदर्भात जर कुणी अशा पद्धतीच्या कृत्यात प्रत्यक्ष सहभागी असल्याची तक्रार केली तर त्याविरुध्द निवडणूक आयोग कायदेशीर कारवाई करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

Tags:    

Similar News