दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या ठाकरे सरकारची राज्यात मात्र आंदोलनबंदी

आंदोलनजीवी म्हणून पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांची थट्टा केल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली होती. पण दुसऱ्याच दिवशी ठाकरे सरकारने आझाद मैदानात आंदोलनबंदी करत

Update: 2021-03-05 08:31 GMT

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चे दरम्यान दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत मोदी सरकारवर टीका केली. पण इकडे अधिवेशनात आपल्या समस्यांवर चर्चा व्हावी यासाठी आझाद मैदानात आंदोलन कऱणाऱ्या आंदोलकांना सरकारने हुसकावून लावले आहे. याच मुद्द्यावरुन भाजपचे आमदार संजय कुटे यांनी विधानसभेत सरकारवर जोरदार हल्ला केला.

विधिमंडळ अधिवेशनात आपले प्रश्न मांडून ते सोडवले जावे यासाठी राज्यभरातून नागरिक, संघटना मुंबईत येऊन मोर्चे काढतात आणि आंदोलन करतात. या सर्व आंदोलकांची आणि आंदोलनांची हक्काची जागा म्हणजे मुंबईचे आझाद मैदान..याच आझाद मैदानात राज्यभरातील संगणक परिचालक, विनाअनुदानित शाळांमधील शेकडो शिक्षकांचे आंदोलन सुरू होते. पण सरकारने कोरोनाचे कारण देत इथे संचारबंदी जाहीर केली आणि सर्व आंदोलकांना दडपशाही करत तिथून हुसकावून लावले. १० वर्षांपासून वेतनासाठी लढा देणाऱ्या संगणक परिचलाकांनी आझाद मैदानात आंदोलन सुरू केले होते. पण पोलिसांनी लाठीचार्ज करत आमचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला आहे. पण आम्ही मुंबई सोडणार नाही असा इशारा या आंदोलकांनी दिला आहे.

Full View

एकीकडे मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत आंदोलन कऱणाऱ्या शेतकऱ्यांचे समर्थन केले आणि मोदी सरकार दडपशाही करत असल्याचा आरोप केला. पण त्याच मुख्यमंत्र्यांनी आझाद मैदानातील आंदोलन मात्र कोरनाचे कारण देत दडपून टाकले आहे. कोरोना काळात राज्य विधिमंडळाचे अधिवेशन होऊ शकते तर आंदोलनं का नाही, असा सवाल आता उपस्थित होतो आहे.



Tags:    

Similar News