पाकचा सरफराज मेमन मुंबईवर दहशतवादी हल्ल्यासाठी पोहचला शहरात?

राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेकडून मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला सावध राहण्याबाबतचा ई-मेल आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या मेलच्या आधारावर मुंबईवर पुन्हा एकदा दहशतवादाचे सावट घोंघावत असल्याचे या मेल वरुन दिसून येत आहे. पाकमध्ये दहशतवादाचे प्रशिक्षण घेतलेले सरफराज मेमन मुंबईवर दहशतवादी हल्ला करण्यासाठी मुंबईत पोहचला असल्याची माहिती एनआयए च्या हाती लागली आहे.;

Update: 2023-02-27 16:11 GMT

मुंबईवर २६/११ रोजी झालेला दहशतवादी हल्ला ( TERROR ATTACK ) आजही मुंबईकर विसरू शकलेले नाहीत. या हल्ल्याने संपूर्ण मुंबई हादरली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा मुंबईवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चीन, हाँगकाँग आणि पाकिस्तानमध्ये ट्रेनिंग घेऊन आलेला सरफराज मेमन ( Sarfaraz Memon ) हा संशयती मुंबईत पोहचल्याची माहिती केंद्रीय गुप्तचर यंत्रणांना NIA मिळाली आहे.

NIA या राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेकडून मुंबई पोलिसांना याबाबत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आणि तशाप्रकारचा ई-मेल सुद्धा मुंबई पोलीसांना आला असल्याची माहिती दिली आहे. मुंबईवर दहशतवादी हल्ला ( TERROR ATTACK ) करण्यासाठी पोहलेला सरफराज हा मूळचा मध्यप्रदेशच्या इंदौरचा असल्याचं मेलमध्ये म्हटले आहे. हा व्यक्ती भारतासाठी धोकादायक असून त्याची ओळख पटावी यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट व आधारकार्डची कॉपीही NIA कडून पोलिसांना मेल द्वारे पाठवण्यात आली आहे. सध्या या संशयित व्यक्तीचा शोध सर्व सुरक्षा यंत्रणांकडून सुरु आहे.

अलीकडेच NIA ने खलिस्तान ( Khalistan ) आणि लॉरेन्स बिश्नोई ( Lawrence Bishnoi ) सिंडिकटप्रकरणी कारवाई करताना ७६ ठिकाणी छापे टाकले होते. यात मुंबईतल्या आग्रीपाडा भागातील एका घराचा समावेश आहे. या प्रकरणी एका ३५ वर्षाच्या संशयिताला समन्स देऊन NIA टिमकडून चौकशी सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. NIA ने ज्याच्यावर संशय घेतला आहे तो इमिटेशन ज्वेलरीचा ( Imitation Jewellery ) व्यापारी असल्याची माहिती आहे. तो चीनमधून इमिटेशन ज्वेलरीची ( Imitation Jewellery ) आयात व निर्यात करतो. हा पैसा हवालामार्गे अतिरेक्यांना पुरवला जात असल्याचे NIA च्या चौकशीत समोर आले आहे.

लॉरेन्स बिश्नोई गँग आणि गोल्डी बराड यांच्या हवाला लिंक मधून NIA ने मुंबईतील दोन संशयितांना रडारवर ठेवण्यात होते. यांची चौकशी करण्यासाठी चंदीगड NIA चे एक पथक मुंबईत दाखल झाले होते. या पथकाने मुंबई पोलीसांच्या मदतीने आग्रीपाडा भागातील एका निवासी इमारतीच्या फ्लॅटवर छापा टाकला असता तिथे चौकशीदरम्यान NIA च्या पथकाला मुख्य संशयीताचा वर्षभरापूर्वी मृत्यू झाल्याचे कळले. तो इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसायाशी संबंधीत होता. तो इमिटेशन ज्वेलरीची ( Imitation Jewellery ) चीनमधून आयात आणि निर्यात करत होता. ही व्यक्ती अनेक गुन्हेगारी कारवायांशी जोडली गेली असल्याने त्याच्यावर पाळत ठेवण्यात आली होती. 

Tags:    

Similar News