वॉट्सअपला टाटा, टेलिग्रामची चलती.....वापरकर्त्यांची संख्या ५० कोटींवर
वॉट्सच्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीला वापरकर्त्यांना नको म्हणत वॉट्सअपला धडा शिकवला आहे. त्यामुळे इतर मेसेजिंग एपची चलती वाढली आहे.;
Whatsappने आपल्या वापरकर्त्यांच्या माहितीचा वापर फेसबुक आणि इतर व्यासपीठांसाठी करण्याचा निर्णय घेत आपल्या प्रायव्हसी पॉलिसीमध्ये बदल केला आहे. पण वापरकर्त्यांना हा निर्णय पटला नसल्याने इतर मेसेजिंग एप वापरण्याकडे वापरकर्त्यांचा कल वाढू लागला आहे. यात वापरकर्त्यांनी सर्वाधिक पसंती दिली आहे ती Telegramme एपला...गेल्या ७२ तासात सुमारे अडीच कोटी लोकांनी टेलिग्राम एप डाऊनलोड केल्याची माहिती टेलिग्रामने दिली आहे.