Tech Fog चे भाजपा कनेक्शन, आयटी सेलचा देवांग दवे मुख्य सुत्रधार असल्याचा आरोप
सामान्य नागरीकांप्रमाणेच राजकीय पक्षांकडूनदेखील सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. तर प्रत्येक पक्षाकडून आपली प्रचार यंत्रणा मजबूत सोशल मीडियाचा वापर केला जातो. तर विरोधकांना नामोहरम करण्यासाठी भाजपाकडून आयटी सेलचा वापर केला जातो, असा आरोप विरोधकांकडून केला जातो. त्यातच भाजपा युवा मोर्चाचा निमंत्रित असलेल्या देवांग दवे याच्यावर टेक फॉग एप चा मास्टरमाईंड असल्याचा आरोप पत्रकार साकेत गोखले यांनी केला आहे. तर ‘टेक फॉग’ बाबत ‘द वायर’ या वेब पोर्टलने खुलासा केला होता.;
भाजपाची प्रचारयंत्रणा मजबूत करण्यासाठी एक अत्याधुनिक व छुपे एप वापरले जात असल्याचा दावा द वायरने आपल्या वृत्तात केला. त्यानुसार भाजपाची लोकप्रियता कृत्रीमरित्या फुगवून सांगण्यासाठी, टीकाकारांना लक्ष करण्यासाठी आणि सोशल मीडियावर जनतेच्या मतांमध्ये बदल घडवण्यासाठी भाजपाच्या वतीने या एपचा वापर केला जात असल्याचा खुलासा द वायरने आपल्या रिपोर्टमध्ये केला. तर भाजयुमोचा माजी राष्ट्रीय सोशल मीडिया सचिव देवांग दवे हाच या टेक फॉगचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप पत्रकार साकेत गोखले यांनी केला. तर देवांग दवे हा सध्या महाराष्ट्र भाजपाचे निवडणूक व्यवस्थापक आहे.
2019 च्या निवडणूकीत देवांग दवे याच्या कंपनीला महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या सिस्टिमॅटिक वोटर्स एज्यूकेशन अँड इलेक्टोरल पार्टिसिपेशन या उपक्रमाचे व्यवस्थापन करण्यासाठी नियुक्त केले होते. त्यानंतर भारतीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाच्या प्रमुखांच्या चौकशीचे आदेश दिले होते. तर काँग्रेसचे तात्कालिन प्रवक्ते सचिन सावंत यांनी निवडणूक आयोगाच्या स्वतंत्र असण्याबद्दल शंका उपस्थित केली होती. तर निवडणूक आयोगाच्या सोशल मीडिया हँडलरपदावर विशिष्ट पक्षाचा व्यक्ती असेल तर निवडणूक आयोगाचा डेटावर प्रश्न उपस्थित करत त्यांनी त्याचे बॅकग्राऊंड चेक का केले नाही? असाही सवाल केला होता.
https://twitter.com/sachin_inc/status/1286309546940436481?t=svM_BiiQEc-owHxmo-rn5w&s=08
त्यानंतर आता देवांग दवे टेक फॉगचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप झाल्याने खळबळ उडाली आहे.
साकेत गोखले यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, काल द वायरने टेक फॉग एपबाबत मोठा खुलासा केला. तर देवांग दवे हा भाजप कार्यकर्ता त्या एपचा मास्टरमाईंड आहे. मी 2020 मध्ये देवांग दवे याला महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने नियुक्त केल्याचे उघड केले होते. त्यावर निवडणूक आयोगाने चौकशीचे आदेश दिले होते. द वायरने उघड केल्याप्रमाणे टेक फॉग एपमध्ये लोकसंख्या शास्रानुसार विभागणी केलेल्या लोकांचा डेटा आहे. जो या एपच्या मास्टरमाईंडकडे आहे. त्याच्याकडे निवडणूकीचा डेटा किती आणि त्याने तो या एप साठी वापरला का? असे प्रश्न उपस्थित करत देवांग दवेकडे निवडणूक आयोगापेक्षा कमी डेटा नसल्याचे म्हटले आहे.