एअर इंडियाची मालकी पुन्हा टाटांकडे
सरकारी मालकीची एअर इंडियाची मालकी तब्बल 67 वर्षांनी पुन्हा एकदा टाटा सन्सकडे गेली आहे. टाटा सन्सकडून एअर इंडियासाठी लावण्यात आलेली बोली मंत्री गटानं मान्य करुन आज अधिकृतरित्या जाहीर केली.;
सरकारी मालकीची एअर इंडियाची मालकी तब्बल 67 वर्षांनी पुन्हा एकदा टाटा सन्सकडे गेली आहे. टाटा सन्सकडून एअर इंडियासाठी लावण्यात आलेली बोली मंत्री गटानं मान्य करुन आज अधिकृतरित्या जाहीर केली.
Air India साठी पॅनलनं टाटा ग्रुपची निवड केली होती. एअर इंडियासाठी टाटा ग्रुप (Tata Group) आणि स्पाइसजेट (SpiceJet)च्या अजय सिंह यांनी बोली लावली होती. १८ हजार कोटींची ही बोली टाटांनी जिंकली आहे.
जेआरडी टाटा यांनी 1932 मध्ये टाटा एअरलाइन्सची स्थापना केली होती. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी विमान सेवा रोखण्यात आल्या होत्या. त्यानंतर विमान सेवा बहाल झाल्यानंतर 29 जुलै 1946 टाटा एअरलाइन्सचं नाव बदलून त्याचं नाव एअर इंडिया लिमिटेड करण्यात आलं होतं. स्वातंत्र्यानंतर 1947 मध्ये एअर इंडियातील 49 टक्के भागीदारी भारत सरकारनं घेतली होती. 1953 मध्ये याचं पूर्ण राष्ट्रीयीकरण करण्यात आलं होतं.
2007 मध्ये इंडियन एअरलाइन्समध्ये विलीन झाल्यानंतर एअर इंडिया कधीच नेट प्रॉफिटमध्ये राहिली नाही. एअर इंडियाला मार्च 2021 मध्ये संपणाऱ्या तिमाहीत सुमारे 10,000 कोटी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कंपनीवर 31 मार्च 2019 पर्यंत एकूण 60,074 कोटींचं कर्ज होतं. परंतु, आता टाटा सन्सला यामधील 23,286.5 कोटी रुपयांचं कर्जाचा भार उचलावा लागणार आहे.