बापरे ! तिने एक दोन नव्हे सलग १२६ तास केले नृत्य
लातूरच्या सृष्टीने अनोखा विश्वविक्रम करून लातूरचे नाव जगाच्या नकाशावर कोरले आहे. पहा महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद बातमी.;
लातूरच्या केवळ सोळा वर्षाच्या सृष्टी जगतापने तब्बल १२६ तास सलग नृत्य करत जागतिक विश्व विक्रम प्रस्थापित केला आहे. सृष्टीने लातूर येथील दयानंद सभागृहात २९ तारखेला नृत्यास सुरवात केली होती. १२६ तास सलग नृत्य करत तिने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डवर तिचे नाव कोरले आहे.
यापूर्वी देखील सृष्टीने सलग २४ तास नृत्य करत आशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये स्वतःच्या नावाची नोंद केली होती.आज हा विश्वविक्रम पूर्ण होण्याच्या क्षणी लातूरकरांनी दयानंद सभागृहात मोठी गर्दी केली होती.
तिच्या या कष्टात लातूरकरांनी मोठा प्रतिसाद दिला.