#SupremeCourt : ४ महत्त्वाच्या प्रकरणांवर कोर्टात काय झाले?

आज सर्वोच्च न्यायालयात चार महत्त्वाच्या केस संदर्भात सुनावणी पार पडली. या सुनावणी दरम्यान न्यायालयाने काय म्हटलं आहे. वाचा...;

Update: 2022-08-25 10:52 GMT

#PMLA : मनी लॉन्ड्रीग अँक्ट...

27 जुलै ला दिलेल्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने आज पुनर्विचार याचिका स्वीकारली, या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे.

या प्रकरणात सर्वोच्च न्यायालय आता फक्त दोन मुद्द्यांवर पुन्हा एकदा सुनावणी करणार आहे

एक म्हणजे आरोपीला ECIR (supply of Enforcement Case Information Report) कॉपी न देणं आणि. दुसरा मुद्दा म्हणजे आरोपी जो पर्यंत दोषी सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याला निर्दोष न मानणं हा मोठा प्रश्न असल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे.

बिल्किस बानो प्रकरण

गुजरातमधील गोध्रा हत्याकांडात पीडित असलेल्या बिल्किसबानो प्रकरणातील 11 दोषींना गुजरात सरकारच्या शिफारसी नंतर सोडण्यात आलं होतं. त्यानंतर या सुटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली.

या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला नोटीस बजावली आहे.

पंतप्रधानांच्या सुरक्षेत त्रुटी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 5 जानेवारीच्या पंजाब दौऱ्यादरम्यान सुरक्षेत झालेल्या त्रुटी संदर्भात एक समिती नेमली होती. या समितीने सर्वोच्च न्यायालयात आपला अहवाल सादर केला. या अहवालानुसार पंजाबचे अधिकारी दोषी असल्याचं म्हटलं आहे.

Pegasus

सरकार नागरिकांची पेगासेस सॉफ्टवेअर मार्फत हेरगिरी करत असलेल्या आरोपावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. या मध्ये न्यायालयाने नेमलेल्या समितीने आपला अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला. समितीने सोपवलेल्या अहवालांपैकी फक्त एक अहवाल सार्वजनिक करण्याची परवानगी न्यायालयाने आज न्यायालयाने दिली आहे. बाकी दोन अहवाल सार्वजनिक करण्यास न्यायालयाने निर्बंध घातले आहेत.

या अहवालात समितीला केंद्राने सहकार्य केलं नसल्याचं म्हटलं आहे. काही मोबाईलमध्ये मालवेअर आढळले. मात्र, हा मालवेअर पेगासस आहे की नाही याबाबत स्पष्टता नसल्याचं या अहवालात म्हटलं आहे.

Similar News