सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासातील मोठा दिवस, ऐतिहासिक खटल्यांचे होणार थेट प्रक्षेपण
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला सुरूवात होणार आहे. त्यामुळे संपुर्ण महाराष्ट्राचे या सुनावणीकडे लक्ष लागले आहे. त्यातच देशभरातील नागरिकांसाठी मंगळवार ऐतिहासिक ठरणार आहे.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला सुरूवात होणार आहे. त्यामुळे संपुर्ण महाराष्ट्राचे या सुनावणीकडे लक्ष लागले आहे. त्यातच देशभरातील नागरिकांसाठी मंगळवार ऐतिहासिक ठरणार आहे.
राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यापार्श्वभुमीवर मंगळवार सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासातील महत्वाचा दिवस ठरणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या तीन घटनापीठासमोर महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी होणार आहे. त्याचे थेट प्रक्षेपण देशभरातील नागरिकांना याचि देही याचि डोळा पहायला मिळणार आहे. त्याबरोबरच EWS आरक्षण आणि बार कौन्सिलच्या वैधतेबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे या तीनही ऐतिहासिक खटल्यांचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने ठरवले आहे. त्यामुळे हा दिवस सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासातील ऐतिहासिक दिवस ठरणार आहे. सकाळी साडेदहा वाजल्यापासून या खटल्यांचे थेट प्रक्षेपण सुरू होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://main.sci.gov.in/display-board#
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
EWS आरक्षणावरील सुनावणीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
बार कौन्सिलच्या सुनावणीबाबत सुनावणी-