Supreme Court : महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष लाईव्ह पाहण्यासाठी नागरिकांची उडाली झुंबड
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष, EWS आरक्षण आणि बार कौन्सिलच्या वैधता या महत्वाच्या खटल्यांच्या सुनावणीचे सर्वोच्च न्यायालयाने थेट प्रक्षेपण केले होते. हे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी देशभरातील नागरिकांची मोठी झुंबड उडाल्याचे पहायला मिळाले. पहा नेमकं किती लोकांनी पाहिले सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीचे थेट प्रक्षेपण?;
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष, EWS आ्ररक्षण आणि बार कौन्सिलच्या वैधतेबाबतच्या याचिकांवर मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता सुनावणीला सुरूवात झाली. दिवसभर या तीनही याचिकांवर सुनावणी पार पडली. परंतू दिवसभरात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी 3 लाख 57 हजार लोकांनी लाईव्ह पाहिली. तर बार कौन्सिलच्या वैधतेसंदर्भातील सुनावणई 98 हजार 915 लोकांनी लाईव्ह पाहिली. याबरोबरच EWS आरक्षणाबाबतची सुनावणी 2 लाख 57 हजार नागरिकांनी लाईव्ह पाहिली.
मंगळवारी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी झाली. शिंदे गटाने आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा केला होता. त्यामुळे ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी पार पडली. ही सुनावणी देशभरातील नागरिकांना थेट पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात आली होती. ही सुनावणी पाहण्यासाठी देशभरातून मोठी झुंबड उडाल्याचे पहायला मिळाले. सुनावणी सुरू झाल्यापासून ठाकरे गटाची याचिका फेटाळल्याचे जाहीर होऊस्तोवर ही सुनावणी 3 लाख 39 हजार नागरिकांनी लाईव्ह पाहिली होती.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणीसोबतच EWS आरक्षणाबाबत सुनावणी पार पडली.
याआधीही सरन्यायाधीश एन व्ही रमण्णा यांच्या निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी कोर्टाची सुनावणी थेट प्रक्षेपित केली होती. त्यानंतर त्यांनी ही सुनावणी थेट प्रक्षेपित केली जाईल, अशी अपेक्ष व्यक्त केली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी कोणत्याही वृत्तवाहिनीद्वारे नाही तर सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटवरून प्रसिध्द करण्यात आली.
सर्वोच्च न्यायालयात असलेल्या घुमटाच्या अगदी खालच्या बाजूला असलेल्या स्थित क्रमांक एक न्यायालय हे मुख्य न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाचे न्यायालय आहे. न्यायालय क्रमांक दोनमध्ये, ज्येष्ठतेच्या क्रमाने, सरन्यायाधीशांच्या शेजारी न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ बसते. त्याचप्रमाणे पदानुसार न्यायाधीश ज्येष्ठतेच्या क्रमाने खंडपीठाचे नेतृत्व करतात.
सुप्रीम कोर्टाची लाईव्ह सुनावणी कोणत्याही चॅनलद्वारे उपलब्ध नसून, सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाइटवर उपलब्ध असेल. हे व्यासपीठ राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र सरकारी एजन्सीद्वारे चालवले जाईल. त्याची लिंक कोर्ट शेअर करेल. प्रत्यक्ष सुनावणीपासून काही सेकंदांच्या विलंबानंतर संबंधित कंटेट वेब पोर्टलवर उपलब्ध होईल. म्हणजेच हे प्रक्षेपण काही सेकंदांनी वेबसाइटवर येईल. जेणेकरून सुनावणीदरम्यान काही आक्षेपार्ह, अयोग्य किंवा अनावश्यक टिप्पणी किंवा युक्तिवाद असेल तर ते वेबकास्टवर जाण्यापूर्वी काढून टाकण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
सर्वोच्च न्यायालयात घटनापीठांपुढील सुनावणीचे थेट प्रक्षेपण मंगळवारपासून सुरू झाले. ज्या पहिल्या तीन खटल्यांचे #LiveStreaming झाले. त्यात महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष #MaharashtraPoliticalCrisis हा महत्त्वाचा खटला आहे.
थेट प्रक्षेपण इथे पाहण्याची लिंक देण्यात आली होती.
सर्वोच्च न्यायालयाच्या तीन घटनापीठासमोर होणाऱ्या कामकाजाचं लाईव्ह प्रक्षेपण नागरिकांसाठी
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर पार पडलेली सुनावणी
EWS आरक्षणावर पार पडलेली सुनावणी
बार कौन्सिलच्या वैधतेवर पार पडलेली सुनावणी