राजीव गांधी हत्या प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता करा, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश.
भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या करणाऱ्या आरोपींंना निर्दोष मुक्त करा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.;
भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची तामिळनाडूतील श्रीपेरंबदुर येथे हत्या झाली होती. या प्रकरणातील सात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र यापैकी सातवा आरोपी ए जी पेरारिवलन यांची सुटका करण्यात आली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने उर्वरित सहाही आरोपींची सुटका करण्याचे आदेश दिले आहेत.
भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या 21 मे 1991 रोजी चेन्नई येथील श्रीपेरंबदुर येथे आत्मघाती बॉम्बस्फोटामुळे झाली. राजीव गांधी यांच्या हत्याप्रकरणातील आरोपींना जन्मठेपेची शिक्षा देखील सुनावण्यात आली होती. या आरोपींमध्ये एस नलिनी, आरपी रविचंद्रन यांच्यासह संधन मुरुगन, राँबर्ट पायास, जयकुमार यांचा समावेश होता. हे आरोपी गेल्या तीन दशकांपासून जन्मठेपेजी शिक्षा भोगत असताना सहा दोषी आरोपींची निर्दोष सुटका करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. यातील सातवा आरोपी एजी पेरारिवलन याची आधीच सर्वोच्च न्यायालयाने सुटका करण्याचे आदेश दिले होते.
नलिनी श्रीहरन सध्या पॅरोलवर बाहेर आहेत यापुर्वी मद्रास उच्च न्यायालयाने नलिनी श्रीहरन यांच्या सुटकेची मागणी करणारी याचिका फेटाळली होती. त्यानंतर नलिनी या आरोपीने सुटकेच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालात धाव घेतली होती.
राजीव गांधी हत्याप्रकरणातील काही आरोपींनी कलम 142 चा आधार घेत स्व:च्या सुटकेसाठी मागणी या आरोपींनी केली होती. यातील सहा आरोपींनी 30 वर्षे शिक्षा भोगली होती.
एकीकडे राहुल गांधी भारत जोडो यात्रेत असताना त्यांचे सुरक्षा कवच भेदले जात आहे. त्यापार्श्वभुमीवर राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांना मुक्त करण्यात आल्याने गांधी घराण्याच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याची चर्चा सुरु झाली आहे.