राज्यात बुधवारपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे आणि छोट्या उद्योगांचे मोठे नुकसान झाले आहे. पण याचबरोबर शेतांमध्ये राबवणाऱ्या आणि तिथेच राहणाऱ्या ऊसतोड मजुरांना तर मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतो आहे. सांगली जिल्ह्यात अचानक पडलेल्या जोरदार पावसामुळे ऊसतोड मजुरांचे संसार पाण्यात गेले आहेत. समडोळी गावात मजुरांच्या झोपड्यांध्ये पाणी शिरले आहे. घरातील साहित्याचे नुकसान झालं आहे. उदरनिर्वाह चालवण्यासाठी पर जिल्ह्यातून आलेल्या मजुरांच्यावर आता अस्मानी संकट कोसळलं आहे. त्यांना संबंधित साखर कारखान्यांनी आणि सरकारने मदत करण्याची मागणी आता होऊ लागली आहे.