बदलापूर अत्याचार प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून अॅड.उज्ज्वल निकम यांची नेमणूक झाली. मात्र या नेमणुकीला विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार आणि उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी तीव्र विरोध केलाय. भाजपचे प्रवक्ते या प्रकरणात सरकारी वकील कसे काय असू शकतात? आणि हे प्रकरण दाबले गेले तर त्याला जबाबदार कोण असणार ? असा सवाल वडेट्टीवार यांनी केलाय.यासंदर्भात विश्लेषण केले आहे मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी.