सहकारी गृहनिर्माण इमारतीतील वेश्याव्यवसाय थांबवा, सामाजिक कार्यकर्त्याची मागणी
सिंप्लेक्स बिल्डिंग सहकारी गृहनिर्माण संस्था या ग्रँट रोड येथील इमारतीत वेश्याव्यवसाय सुरू असल्याने तो बंद करावा, अशी मागणी विक्रम कांबळे यांनी केली आहे.;
सिंप्लेक्स बिल्डिंग सहकारी गृहनिर्माण संस्था या ग्रँट रोड येथील इमारतीत वेश्याव्यवसाय सुरू असल्याने तो बंद करावा, अशी मागणी विक्रम कांबळे यांनी केली आहे.
मुंबईतील ग्रँट रोड पूर्व येथील पाववाला रोडवरील सिम्प्लेक्स बिल्डिंग सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या इमारतीत मोठ्या प्रमाणावर वेश्याव्यवसाय सुरू आहे. यासंदर्भात गृहनिर्माण संस्थेच्या उपनिबंधकानी सांगितले की, याबाबतची कारवाई पोलिस प्रशासन करील. मात्र पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार या वेश्याव्यवसाय असलेल्या ठिकाणी आम्ही धाडी टाकतो. त्यामध्ये महिलांना ताब्यात घेऊन दंड केला जातो. मात्र त्यानंतरची जबाबदारी आमची नसते, असं पोलिसांनी सांगितल्याचे विक्रम कांबळे म्हणतात.
वेश्याव्यवसायाबाबत सुप्रीम कोर्टाचे निर्देश
१) सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार वेश्याव्यवसाय हा एक व्यवसाय आहे. त्यामुळे पोलिसांनी वेश्या व्यवसायाकडे व्यवसाय म्हणून पाहावे.
२) वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांनी संमतीने लैंगिक संबंध ठेवल्यास अटक, शिक्षा, छळ, छापे मारले जाऊ नयेत.
३) वेश्यागृहांवर छापे टाकल्यास वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना दंड ठोठावू नये. कारण वेश्या व्यवसाय बेकायदेशीर नाही. मात्र वेश्यालय चालवणे बेकायदेशीर आहे.
३) वेश्याव्यवसाय करणारी महिला खोली घेऊन हा व्यवसाय करू शकते. मात्र वेश्यालय बेकायदेशीर असल्याने त्यावर कारवाई करावी.
कोर्टाचे निर्देश पायदळी तुडवले गेले असल्याचे यावेळी उपोषणकर्ते विक्रम कांबळे यांनी सांगितले. त्याबरोबरच म्हाडाच्या इमारतीमध्ये चुकीच्या पद्धतीने फ्लॅट लाटून अशा प्रकारे वेश्याव्यवसाय करणाऱ्यांविरोधात कारवाई करावी, अशी मागणी विक्रम कांबळे यांनी केली